घरमुंबईशिवसेनेच्या अनिल देसाई यांनी केली बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा

शिवसेनेच्या अनिल देसाई यांनी केली बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा

Subscribe

काँग्रेसची नाराजी दूर करण्यासाठी अनिल देसाई यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. काँग्रेसचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी अनिल देसाई बाळासाहेब थोरात यांना भेटले असून, लवकरच मुख्यमंत्री काँग्रेस नेत्यांना भेटीसाठी वेळ देणार आहेत, असे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन अनिल देसाई यांनी थोरातांची भेट घेतली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याचे समजते. हे सरकार चांगल्या रितीने सुरू आहे. तसेच तिन्ही पक्ष चांगले सरकार चालवत आहेत. लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल, अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी दिली.

महाविकासआघाडी सरकारमध्ये योग्य स्थान मिळत नसल्याची उघड नाराजी काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली. यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटण्यासाठी वेळही मागितली, पण ही भेट अजून झालेली नाही. दरम्यान, ‘आमच्या काही प्रश्नांबाबत माहिती घेण्यासाठी अनिल देसाई आले होते. मुख्यमंत्र्यांच्या घरात दु:खद घटना झाल्यामुळे दोन दिवस भेट झाली नाही. लवकरच भेट होईल,’ अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी या भेटीनंतर दिली.

- Advertisement -

कालच्या सामना अग्रलेखातून काँग्रेसमधील नाराजी नाट्यावर भाष्य करण्यात आले होते. प्रशासनातील अधिकाऱ्यांवरून काँग्रेसमध्ये नाराजी आहे. यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू असे वक्तव्य बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी केले. त्यावर आता ‘सामना’तून काँग्रेसला चिमटा काढण्यात आला. जुनी खाट अधूनमधून कुरकुरते अशा शब्दांत सामनातून काँग्रेसच्या नाराजी नाट्यावर निशाणा साधला. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करू नये, असा अप्रत्यक्ष इशारा देखील भाजपला देण्यात आला होता. त्यानंतर महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहे, हे दर्शवण्यासाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या. त्यातून अनिल देसाई आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील ही चर्चा घडली असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा –

गलवानमधील चकमक हा पू्र्वनियोजित कट; परराष्ट्र मंत्र्यांनी सुनावले चीनला खडेबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -