घरमुंबईशिवशाहीचा प्रवास बनलाय त्रासदायक...

शिवशाहीचा प्रवास बनलाय त्रासदायक…

Subscribe

ऐन उन्हळ्यात एसी असतात बंद - प्रवाशांच्या श्वास गुदमरतोय

 एसटी प्रवास, सुखाचा प्रवास असे ब्रीदवाक्य असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमधून प्रवाशांना दर्जेदार व आरामदायी प्रवासाची सुविधा देण्यासाठी महामंडळाकडून शिवशाही बस सुरू करण्यात आली आहे. मात्र या शिवशाहीचा प्रवास आरामदायी होण्याऐवजी त्रासदायक होत आहे. असाच धक्कादायक अनुभव एका प्रवाशाला आला. संबंधित प्रवासी ज्या बसगाडीतून प्रवास करत होता, त्याची एसी बंद होती. त्याची तक्रार करत त्यांनी दुसरी शिवशाही बसगाडी पकडली. त्यातही एसी बंद असल्याचा अनुभव आल्याने संबंधीत प्रवाशी एसटी महामंडळाच्या कारभारावर चांगलाच संतापला.

मिलिंद निमोनकर हे कल्याण स्वारगेट शिवशाही बसने रविवारी सकाळी काही कामानिमित्त पुण्यासाठी निघाले होते. मात्र कल्याण डेपोपासूनच या गाडीतील एसी बंद होता. त्यामुळे त्यांनी दुसरी शिवशाही पकडली, त्यातही एसी बंद असल्यामुळे गाडीमध्ये बसलेले प्रवासी घामाघूम झाले होते. यात लहान मुले आणि वयस्कर यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. एसी बंद असल्याने व शिवशाही प्रवाशांनी भरगच्च भरल्यामुळे प्रवाशांचा श्वास गुदमरत होता. त्यामुळे प्रवाशांनी आरडाओरडा केला. शिवशाही चालकांनी बस थांबवून शिवशाहीच्या खिडक्या उघड्या केल्या. जवळ जवळ अडीच तास बसमधील अबाल वृद्धांचे उकाड्याने अतोनात हाल झाले.

- Advertisement -

दरम्यान मदतीसाठी एसटी महामंडळाच्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मिलिंद निमोनकर यांनी सोशल मीडियावर यासंबंधी तक्रार मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना केली. त्यानंतर काहीवेळा नंतर एसटी महामंडळाच्या सेंट्रल डेपोतून मदत मिळाली. मात्र एसी सुरू झालाच नाही. कल्याण-स्वारगेट शिवशाही बसमध्ये एकंदरीत ४३ प्रवासी होते. त्यात लहान मुले, वयस्कर होते. शिवशाही एसी बस असल्याने खिडकी उघडत नाही. बसच्या छताला दोन व्हेंटीलेशन देण्यात आले आहेत, मात्र त्यातूनही पुरेशी हवा येत नाही, अशी प्रवाशांची तक्रार आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान अशा प्रकारची अडचण उद्भवल्यास त्याला पर्यायी व्यवस्था देण्यात यावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

भाडे परत द्या ?
सध्या राज्यभरात १ हजाराहून अधिक शिवशाही बसगाड्या धावत आहेत. त्यापैकी एसटी महामंडळाच्या स्वतःच्या 500 गाड्या आहेत, तर खासगी कंपन्यांकडून घेतलेल्या ५०० गाड्या आहेत. उन्हाळा असल्याने शिवशाहीने प्रवास करायला गेलो आणि मनस्ताप झाला. गरजेच्या वेळी एसटीच्या हेल्पलाईनकडूनही मदत मिळत नाही. एसटी महामंडळाने अशा बसमधील एसी बंद झाल्यावर व्हेंटिलेशनसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची सोय केली पाहिजे, तसेच असा एखादा प्रसंग उद्भवलाच तर प्रवाशांना त्यांचे पूर्ण पैसे परत केले पाहिजेत आणि झालेल्या गैरसोयीची भरपाई म्हणून पुढचा एक प्रवास फ्री दिला पाहिजे.
– मिलिंद निमोनकर, शिवशाही बसगाडीचे प्रवासी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -