घरमुंबई'या' हॉस्पिटलमध्ये 'स्पीच थेरेपी' सुरू!

‘या’ हॉस्पिटलमध्ये ‘स्पीच थेरेपी’ सुरू!

Subscribe

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये 'स्पीच थेरेपी' हा विभाग सुरू करण्यात आला आहे. ९ जानेवारीपासून ही सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध झाली आहे.

एखाद्या अपघातात जखमी झाल्यावर बर्‍याच वेळा रुग्णांना ऐकण्याचा, बोलण्याचा त्रास जाणवतो. एवढेच नव्हे तर नवजात शिशु तसेच वृद्ध व्यक्ती यांच्यामध्येही ऐकण्याचा दोष निर्माण होतो. यासाठी जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये स्पीच थेरेपी हा विभाग सुरू करण्यात आला आहे. ९ जानेवारीपासून ही सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध झाली आहे. ‘ज्या रुग्णांना ऐकण्याचा त्रास जाणवतो, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आवश्यक विभाग तसेच ‘यंत्र ट्रॉमा’ हॉस्पिटलमध्ये नसल्याने हा विभाग लवकरात लवकर सुरू करावा’, अशी मागणी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्याकडे रुग्णांनी केली होती. त्यानुसार वायकर यांनी हॉस्पिटलच्या प्रशासनाची भेट घेऊन चर्चा केली. त्यानुसार, याविषयीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. महापालिकेत या प्रश्नावर चर्चा केल्यानंतर हा विभाग रुग्णांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा – कामगार हॉस्पिटलच्या पुनर्विकासाला केंद्राचा हिरवा कंदील!

- Advertisement -

‘या’ दिवशी सुरु असणार सुविधा

दर आठवड्याला सोमवार, बुधवार तसेच शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ही सुविधा सुरु असणार आहे. या विभागाअंतर्गत दरदिवशी सुमारे ५ ते ७ रुग्णांची तपासणी केली जात असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता हरबन्ससिंग बावा यांनी दिली. ते म्हणाले की, “गेल्या अनेक वर्षांपासूनची रुग्णांची मागणी पूर्ण झाली आहे. जवळपास या थेरेपीचा २०० ते ३०० रुग्णांना फायदा होणार आहे. आठवड्याला सोमवार, बुधवार तसेच शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सेवा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांना ही सुविधा उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे”.


हेही वाचा – जे.जे. हॉस्पिटलमध्ये ‘देणगी समिती खाते’ सुरू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -