घरमुंबईम्हाडाच्या अधिकाऱ्याकडून एसआरएच्या फाईल गायब

म्हाडाच्या अधिकाऱ्याकडून एसआरएच्या फाईल गायब

Subscribe

दीपक पवार

भ्रष्टाचाराचे कुरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात( एसआरए) कामाला असताना एका म्हाडाच्या अधिकाऱ्याने आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी अनेक फाईलच गायब केल्याची माहिती उजेडात आली आहे. या फाईल एसआरएच्या बेकायदेशीर मंजुरी दिलेल्या प्रकल्पांच्या आहेत. त्या अधिकाऱ्याला एसआरएने ७ दिवसांत फाईल जमा करण्याचे आदेश दिले आहेत. तसे न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
एसआरए प्रकल्पांना गती मिळावी यासाठी म्हाडातील अधिकाऱ्यांना गृहनिर्माण विभागाकडून एसआरएमध्ये पदोन्नतीवर पाठवण्यात येते. त्यानुसार म्हाडातील अनेक अधिकारी सध्या एसआरएमध्ये कार्यरत आहेत. एसआरएमध्ये कार्यकारी अभियंतापदी कार्यरत असताना सुनिल ननावरे यांनी आपल्या पदाचा गैरवार केला.

- Advertisement -

काय केला भ्रष्टाचार?

उपनगरातील खार रोड येथील महाराष्ट्र नगर, गृहनिर्माण संस्थेच्या कानकीय पॅलेस आणि नरीमन पाँईट येथील महात्मा फुले गृहनिर्माण संस्थेच्या प्रकल्पांना एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची परवानगी न घेताच परस्पर मंजुरी देऊन टाकली.
या प्रकल्पांना मंजुरी दिल्यानंतर काही दिवसांनी सुनील ननावरे यांची बदली करण्यात आली. सध्या ते म्हाडामध्ये उपमुख्य अधिकारीपदी कार्यरत आहे. पदभार सोडताना ननावरे यांनी प्रकल्पांना मंजुरी दिल्याच्या फाईल गहाळ केल्या. तसा ठपका एसआरएने ठेवला आहे.

- Advertisement -

म्हाडाला पाठवली नोटीस

ननावरे यांनी संबंधित प्रकल्पाच्या फाईल तातडीने जमा कराव्यात, असे पत्र एसआरएने यापूर्वी त्यांना पाठवले आहे. मात्र ननावरे यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही. अखेर एसआरएने म्हाडालाच नोटीस पाठवली आहे. म्हाडात कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याने तातडीने फाईल्स जमा कराव्यात अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देणारी नोटीस एसआरएने नुकतीच म्हाडाला पाठवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -