घरमुंबईराज्य महिला आयोगाची कवी दिनकर मनवर यांना नोटीस

राज्य महिला आयोगाची कवी दिनकर मनवर यांना नोटीस

Subscribe

कवी दिनकर मनवर यांची 'पाणी कसं अस्तं' या कवितेतील त्या ओळीमुळे आता महिला आयोगाने त्यांना नोटीस पाठवली आहे.

राज्य महिला आयोगाकडे विविध संघटनांनी मुंबई विद्यापीठाने तृतीय वर्ष कला शाखेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या कवी दिनकर मनवर यांच्या ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या कवितेत आदिवासी महिलांविषयक आक्षेपार्ह वाक्यरचना केल्याची तक्रार केली आहे. या तक्रारींची दखल घेत राज्य महिला आयोगाने दिनकर मनवर यांना नोटीस बजावली असून २० ऑक्टोबर रोजी व्यक्तिशः उपस्थित राहून आपले म्हणणे आयोगासमोर मांडावे, असे आदेश दिले आहेत.

हे वाचा – कविता का? काव्यसंग्रहच अभ्यासक्रमातून वगळा – दिनकर मनवर

सदर कविता अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यामागची मुंबई विद्यापीठ अभ्यासक्रम समितीची भूमिका स्पष्ट करणारा अहवाल १९ ऑक्टोबर २०१८ रोजी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी व्यक्तिशः उपस्थित राहून अथवा अध्यक्ष, अभ्यास मंडळ यांनी प्रत्यक्ष सादर करावा, असे निर्देश मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना देण्यात आले आहेत.

- Advertisement -

हे वाचलं का – जांभळ्या स्तनांचा तालिबानी संदेश

नेमके काय आहे प्रकरण?

कवी दिनकर मनवर यांची ‘पाणी कसं अस्तं’ ही कविता मुंबई विद्यापीठाच्या पदवी शिक्षणातील मराठी तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात घेण्यात आली होती. ही कविता मनवर यांच्या ‘दृष्य नसलेल्या दृष्यात’ या कविता संग्रहातून घेतली गेली आहे. या कवितेमध्ये आदिवासी स्त्रीयांवर आक्षेपार्ह शब्दांत लिहिले असल्याची टीका काही संघटनांनी केली होती. ही कविता अभ्यासक्रमातून वगळावी अशी मागणी या संघटनांनी केली होती. यासाठी या संघटनांनी आंदोलन केले. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने अखेर या कवितेला अभ्यासक्रमातून वगळले आहे. यानंतर आता कवी दिनकर मनवर यांनी एक निवेदन जाहीर केले आहे.

तसेच औरंगाबाद येथील पत्रकार सुरेश पाटील यांनी सोशल मीडियावर महिलांविषयी अश्लील टिपणी केली होती. त्याविरोधातही आयोगाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेत राज्य महिला आयोगाने सुरेश पाटील यांना २० ऑक्टोबर रोजी आयोगापुढे हजर रहावे, असे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणी औरंगाबाद पोलिसांच्या सायबर सेल विभागास तात्काळ कारवाई करावी आणि त्याचा अहवाल आयोगास सादर करावा असे निर्देश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -