घरमुंबईमुंबई पुणे एक्सप्रेस वे वर अपघात कमी करण्यासाठी सुकाणू समिती

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर अपघात कमी करण्यासाठी सुकाणू समिती

Subscribe

२०१९ या वर्षभरात ९१ जणांनी गमावला जीव

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर अपघाताची संख्या कमी करण्यासाठी सुकाणू समिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सेव्ह लाईफ फाऊंडेशनसह विविध विभागांच्या प्रतिनिधींची नियुक्ती समितीवर करणे यामुळे शक्य होईल. गृह विभागाच्या अध्यक्षतेखाली या समिती सदस्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या शासन निर्णयानुसार या समितीवर गृह निभाग, आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, शिक्षण, परिवहन आदी विभागांचे प्रतिनिधी असतील. तसेच सेव्ह लाईफ फाऊंडेशनसह बी व्ही जी रूग्ण वाहिका यांच्या प्रतिनिधींची नियुक्ती समितीवर करण्यात आली आहे.

सेव्ह लाईफ फाऊंडेशसोबत झालेल्या करारान्वये सुचविण्यात आलेल्या शिफारशी चर्चा होणे समिती सदस्यांकडून अपेक्षित आहे. त्यानंतर समितीने दिलेल्या सूचना, शिफारशी लागू करण्यात येणे अपेक्षित आहे. समितीने दिलेल्या सूचनांच्या कार्यवाहीचा अहवाल दर तीन महिन्यांनी सादर करण्यात येणार आहे. सुकाणू समिती सेव्ह लाईफ फाऊंडेशसोबत मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर अपघात कमी करण्यासाठी झालेल्या करारावर कार्यवाही करण्याचे काम प्रामुख्याने करेल.

- Advertisement -

अपघातांना आळा घालण्यासाठी अपघाताची शास्त्रशुद्ध माहिती जमा करणे, तसेच या माहितीचे विश्लेषण करणे, अपघाताची संख्या कमी करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करणे, समितीकडून शिफारशी सुचवणे तसेच अंमलबजावणी करणे यासारख्या गोष्टी सेव्ह लाईफ फाऊंडेशसोबत झालेल्या करारान्वये सुचविण्यात आलेल्या आहेत.

वर्षभरात ३५२ अपघात

1अवघ्या एका वर्षात मुंबई पुणे एक्सप्रेस वेव वर ९१ जणांचा मृत्यू विविध अपघातांमध्ये घडला आहे. तर तर १७५ जण अपघातात मृत्यूमुखी पडल्याची आकडेवारी संपुर्ण २०१९ या वर्षामध्ये समोर आली आहे. संपुर्ण २०१९ या वर्षभरात या मार्गावर ३५२ अपघात घडले असल्याची माहिती महाराष्ट्र महामार्ग पोलिसांनी जाहीर केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -