घरमुंबईविद्यार्थ्यांना स्थलांतर प्रमाणपत्र मिळणार ऑनलाईन

विद्यार्थ्यांना स्थलांतर प्रमाणपत्र मिळणार ऑनलाईन

Subscribe

स्थलांतर प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध व्हावे यासाठी मुंबई विद्यापीठाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली आहे.

मुंबई विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता स्थलांतर प्रमाणपत्र ऑनलाईन मिळणार आहेत. या शैक्षणिक वर्षापासून ही सुविधा विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करुन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. विद्यापीठात विविध पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे असलेल्या १६ अंकी पीआरएन आणि त्या-त्या महाविद्यालयाचे ऑनलाईन ट्रान्सफर सर्टिफिकेट असेल असे विद्यार्थी www.mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरुन स्थलांतर प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करुन ऑनलाईन स्थलांतर प्रमाणपत्र प्राप्त करु शकतील.

हेही वाचा – वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी केले वृक्षरोपण

अशी आहे प्रक्रिया

यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगिन आयडीवरुन संकेतस्थळावर लॉगिन करुन लॉगिनमध्ये उपलब्ध असलेल्या विविध इंग्रजी आद्याक्षरापैकी M या अक्षरावर क्लिक केल्यावर Migration ही लिंक उपलब्ध होईल, यातून विद्यार्थ्यांना स्थलांतर प्रमाणपत्र अर्ज आणि शूल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

- Advertisement -

ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश www.mum.digitaluniversity.ac या प्रणालीवरुन झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध असेल तर ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश या प्रणालीमार्फत झाले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी पूर्वीच्याच पद्धतीने महाविद्यालयामार्फत अर्ज करावेत असे विद्यापीठामार्फत सर्व संबंधितांना कळविण्यासाठी विद्यापीठामार्फत परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -