घरमुंबईमुनगंटीवार म्हणतात, 'तीनतेरा वाजवतील', पण चित्राताईंचं उत्तर वेगळंच!

मुनगंटीवार म्हणतात, ‘तीनतेरा वाजवतील’, पण चित्राताईंचं उत्तर वेगळंच!

Subscribe

सुधीर मुनगंटीवार यांनी चित्रा वाघ यांच्या भाजप प्रवेशावर थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला.

भाजपने आज खऱ्या अर्थाने मेगा भरती घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेतले. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ‘व्याघ्र दिनाच्या दिवशी आपण वाघाची वाढलेली आकडेवारी सांगितली होती. राज्यात ३१२ वाघ आहेत. चित्रा वाघ यांच्या भाजप प्रवेशानंतर वाघांची संख्या ३१३ झाली असून चित्रा वाघ आधीच्या पक्षाचे तीन तेरा वाजवतील’, असे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केले. भाजपच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

चित्राताईंनी मागितले राष्ट्रवादीचे आभार

चित्रा वाघ यांनी मात्र ‘आपलं महानगर’शी बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल राष्ट्रवादीचे आभार व्यक्त केले. तसेच पतीवर झालेल्या कारवाईमुळे पक्ष सोडलेला नसून त्यामागे संघटनेमधील वैयक्तिक कारणे असल्याचे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले. बुधवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, आ. वैभव पिचड, आ. संदीप नाईक, काँग्रेसचे आ. कालिदास कोळंबकर, राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ, फुले यांच्या वशंज निताताई हुले आणि ज्येष्ठ पोलीस अधिकारी साहेबराव पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला.

- Advertisement -

हेही वाचा – पक्षप्रवेश झाले, ताकद वाढली; आता युतीवर वाचा काय म्हणतात मुख्यमंत्री!

‘भाजप प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही’

‘भाजप ही काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, तर हा जनतेचा पक्ष आहे. आज प्रवेश दिलेल्या नेत्यांना आम्ही आप सब आगे बढो, हम तुम्हारे साथ है, या वाक्याप्रमाणे ही पार्टी तुमच्या पाठिशी उभी राहील, असा विश्वास देतो’, असं सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी नव्याने प्रवेश केलेल्या नेत्यांना उद्देशून सांगितलं.

‘तुम्ही फक्त भाजपमध्येच फिट!’

कालिदास कोळंबकर यांच्या प्रवेशावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, ‘कोळंबकर यांना अनेक जण बोलत होते, ‘इकडे या हे बंधन बाधा ते बंधन बांधा’. पण मी कालिदास कोळंबकर यांना सांगितले की तुम्ही फक्त भाजपमध्ये फिट आहात. आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे स्वागत आहे’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -