घरमहाराष्ट्रनाशिककसारा घाटात सुमारे तीन तासापासून वाहतूक ठप्प

कसारा घाटात सुमारे तीन तासापासून वाहतूक ठप्प

Subscribe

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना सहन करावा लागतोय मनस्ताप

कसारा घाटातील जुन्या मार्गावरील रास्ता खचल्याने या सुमारे तीन तासापासून हा महामार्ग ठप्प झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक नव्या मार्गावरून वळविण्यात आली आहे. दोन्ही मार्गावरील बाजूकडील वाहतूक एकाच मार्गावरून वाळविल्याने घाटात वाहनांच्या रांगाच रांगा दिसत आहे.

जुन्या घाटामध्ये रस्ता खचल्याने मागच्या महिन्यातच ठेकेदाराकडून काम करण्यात आले होते तेव्हा देखील हि वाहतूक एकेरी मार्गाने वळविण्यात आली होती. आता त्याच रस्त्याला भेगा पडल्याने ठेकेदाराने पुन्हा काम सुरु केले असून हि वाहतूक एकेरी मार्गाने वळविली आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

प्रशासनाने वेळीच या प्रकरणात लक्ष देऊन तातडीने ठेकेदाराकडून चांगल्या दर्जाचे काम पूर्ण करून घ्यावे अशी मागणी नागरिक तसेच प्रवासी करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -