घरमुंबईसुजय विखे पाटील मातोश्रीवर, सेना प्रमुखांचे घेतले आशीर्वाद

सुजय विखे पाटील मातोश्रीवर, सेना प्रमुखांचे घेतले आशीर्वाद

Subscribe

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज मातोश्रीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. निवडणुकीमध्ये सेना आपली साथ देणार असल्याचे त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश घेतला आहे. सुजय पाटील यांनी निवडणुकीच्या दृष्टीने मित्र पक्षांची भेट घेणे सुरु केले आहे. निवडणुकीदरम्यान शिवसेनेची साथ मिळावी यासाठी आज सुजय विखे पाटील मातोश्रीवर गेले होते. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट विखे पाटील  यांनी घेतली. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचे स्वर उमटले आहे. काँग्रेस जेष्ठ नेत्याच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षाला याचे नुकसान होईल अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांकडून दिल्या जात आहे.

काय म्हणाले सुजय विखे पाटील

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “भाजप मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मित्रपक्ष शिवसेना आपल्या पाठीशी उभा राहील ही मागणी करण्यासाठी आज मी मातोश्रीवर आलो होतो. निवडणूकीसाठी सेना प्रमुखांचे आशीर्वाद मागितले होते. शिवसेना ही आपल्या पाठीशी उभी राहिल असे आश्वासन शिवसेना प्रमुखांनी दिले आहेत.” – सुजय विखे पाटील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -