घरक्रीडाWomen’s World Cup 2022: इंग्लंडचा पराभव; ऑस्ट्रेलियानं सातव्यांदा पटकावले महिला विश्वचषकाचे जेतेपद

Women’s World Cup 2022: इंग्लंडचा पराभव; ऑस्ट्रेलियानं सातव्यांदा पटकावले महिला विश्वचषकाचे जेतेपद

Subscribe

न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च येथे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात महिला विश्वचषकाचा अंतिम सामना झाला. या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय झाला आहे. या विजयसह ऑस्ट्रेलियानं सातव्यांदा महिला विश्वचषकाचे जेतेपद पटकावलं आहे. ऑस्ट्रेलियानं ७१ धावांनी इंग्लंडचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं ३५६ धावांचं लक्ष्य इंग्लंड समोर उभं केलं. तसंच, ३५६ धावांचं हे आव्हान महिला विश्वकपातील सर्वाधिक आव्हान आहे. विशेष म्हणजे या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सलामीवीर अॅलिसी हिल्सनं इतिहास रचला. १७० धावांची खेळी करत तीन दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं.

अंतिम समान्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळं ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी ३५६ धावांचं लक्ष्य इंग्लंड समोर ठेवलं होतं. मात्र या लक्षाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला चांगली सुरूवात करता आली नाही. संघाची १२ धावा असताना वैय तंबुत परतली. त्यानंतर बेमाउंट आणि कर्णधार हीदर नाईट बाद झाले. संघाची ८६ धावा असताना तीन खेळाडू बाद झाल्यानं इंग्लंड संघाच्या चिंतेत वाढ झाली. मात्र त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या नटाली स्कीवर संघाला धीर देण्याचा प्रयत्न केला. नटाली स्कीवरनं शतकी खेळी करत संघाला विजयाच्या शर्यतीत जवळ आणलं.

- Advertisement -

मात्र, या नटाली स्कीवरला संघातील इतर खेळाडूंना साथ देता आली नाही. त्यामुळं इंग्लंडचा संघ ४३.४ षटकांत २८५ धावांवर तंबुत परतला. या पराभवासह इंग्लंडला महिला विश्वचषकात पाचव्यांदा पराभव पत्करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाकडून किंग आणि जॉन्सन यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. आणि स्कटला दोन गडी मिळाले. गार्डनर आणि मॅकग्राथ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

नताली स्कायव्हरने इंग्लंडसाठी शानदार फलंदाजी करत १२१ चेंडूत १५ चौकार आणि १ षटकार मारत १४८ धावा करत नाबाद राहिली. स्क्राइव्हर इंग्लंडसाठी सामना जिंकू शकली असती. परंतु संघातील दुसऱ्या खेळाडूंना तिला साथ देता आली नाही. दरम्यान याआधी ऑस्ट्रेलियानं १९७८, १९८२ आणि १९८८ मध्ये सलग तीनवेळा इंग्लंडला या महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत केलं होतं.

- Advertisement -

अॅलिसी हिलीनं रचला इतिहास

न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च येथे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात महिला विश्वचषकाचा अंतिम सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सलामीवीर अॅलिसी हिलीनं तुफानी फलंदाजी करत इतिहास रचला आहे. अ‍ॅलिसी ही महिला व पुरुषांच्या कोणत्याही एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करणारी क्रिकेटपटू ठरली आहे. विशेष म्हणजे अॅलिसी हिलीनं १७० धावांत तीन दिग्गज खेळाडुंना मागे टाकलं आहे. त्यामुळं तिच्या फलंदाजीची सर्वत्र चर्चा होत आहे.

अॅलिसी हिलीनं उत्कृष्ट विक्रम करत ऑस्ट्रेलियाचा माजी स्टार क्रिकेटर आणि यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्ट आणि माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांना मागे टाकले आहे. शिवाय वेस्ट इंडिजचे दिग्गज सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनाही मागे टाकत क्रिकेटविश्वात नवा इतिहास रचला आहे.


हेही वाचाWomen’s World Cup 2022: ऑस्ट्रेलियाची सलामीवीर अॅलिसी हिलीनं रचला इतिहास; तीन दिग्गज खेळाडूंना टाकलं मागे

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -