घरताज्या घडामोडीरियाची चौकशी करणारे DCP अभिषेक त्रिमुखे पॉझिटिव्ह; कुटुंबालाही कोरोनाची लागण

रियाची चौकशी करणारे DCP अभिषेक त्रिमुखे पॉझिटिव्ह; कुटुंबालाही कोरोनाची लागण

Subscribe

सुशांत सिंह प्रकरणात, सीबीआयच्या कोऑर्डिनेशनसाठी त्यांची नियुक्ती मुंबई पोलिसांनी केली होती

सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची चौकशी करणारे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर त्यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे.

डीसीपी त्रिमुखे यांच्यावरील सुशांत प्रकरणातील चौकशीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. सुशांत सिंह प्रकरणात, सीबीआयच्या कोऑर्डिनेशनसाठी त्यांची नियुक्ती मुंबई पोलिसांनी केली होती तर सुरुवातीच्या सुशांत प्रकरणाच्या तपासादरम्यान त्यांनी सीबीआयला अनेक वेळा भेटही दिली. रिया चक्रवर्ती हिच्या कॉल डिटेलवरून हे उघड झाले आहे की, सुशांत सिंहच्या निधनानंतर रियाचे वांद्रे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्याशी फोनवर बरेच बोलणे झाले असल्याचे ही सांगितले जात आहे.

- Advertisement -

रिया चक्रवर्ती ही डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्या सतत संपर्कात असल्याचे कॉल डिटेलमध्ये समोर आले. दरम्यान असे सांगितले जात आहे की, रिया आणि डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्यामध्ये फोन कॉल आणि मॅसेजवरून बरेच बोलणे झाले आहे. तर आता अभिषेक त्रिमुखे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर आली आहे.


रिया आणि तिच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्या – सीबीआय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -