घरमुंबई'मुंबई पोलिसांची भीती वाटते'; म्हणणाऱ्या कंगनाला संजय राऊतांनी सुनावले खडेबोल

‘मुंबई पोलिसांची भीती वाटते’; म्हणणाऱ्या कंगनाला संजय राऊतांनी सुनावले खडेबोल

Subscribe

अभिनेत्री कंगना रनौत हिने मुंबई पोलिसांवर अविश्वास दर्शवत त्यांची भीती वाटत असल्याचे म्हटले होते. तिच्या या वक्तव्यावर संतापून खासदार संजय राऊत यांनी तिला मराष्ट्रातून निघून जाण्यास सांगितले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणी सातत्याने भाष्य करणाऱ्या कंगनाने मुंबई पोलिसांची सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. बॉलीवूडमधील माफियांपेक्षा आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटते, असे तिने म्हटले होते. त्यावर संजय राऊत यांनी कंगनाला खडेबोल सुनावले आहेत.

भाजप नेते राम कदम यांच्या ट्विटवर बोलताना कंगनाने ट्विट केले होते की, सर…माझ्या काळजीसाठी धन्यवाद, पण खरंतर मला आता मुव्ही माफीया गुंडापेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय. त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी. पण मुंबई पोलीस नको प्लिज.

- Advertisement -

काय म्हणाले संजय राऊत

जर हिमाचल प्रदेशमध्ये महाराष्ट्रातील व्यक्ती राहत असेल आणि ती जर असं म्हणत असेल की माझा शिमला पोलिसांवर विश्वास नाही. अशा वेळी मी म्हणेल की जर विश्वासच नाही, तर शिमलामध्ये राहू नको. तुम्ही तिथं राहता, खाता, तिथं कमवता, ओळख मिळवता आणि शिमला पोलिसांवर थुंकता. मग हा काय तमाशा आहे. जर मी या राज्यात राहतो, तर माझा अधिकार आहे, पोलिसांसोबत संवाद ठेवण्याचा. जर मला काही समस्या असेल तर त्यांना सांगेल. कुणीही व्यक्ती मुंबई पोलीस, राज्य सरकार यांच्याविषयी बोलते. हे बरोबर नाहीये. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना आवाहन करतो की, जे लोक मुंबई पोलिसांविषयी वाईट बोलत आहेत. आणि राज्यातील जे राजकीय पक्ष अशा व्यक्तींचं समर्थन करत आहेत, अशांविरुद्ध कारवाई करावी.

हेही वाचा –

Supreme Court : अवमान प्रकरणी प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -