घरमुंबईव्यसनमुक्ती केंद्रात तरुणाचा संशयास्पद मृत्यू

व्यसनमुक्ती केंद्रात तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Subscribe

संचालकांवर गुन्हे दाखल

नशेपासून मुक्तीसाठी गेलेल्या 31 वर्षीय तरुणाचा व्यसनमुक्ती केंद्रातच संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना मुंब्रा परिसरात घडली आहे. मुंब्रा बायपासजवळील अल तायेबिन व्यसन मुक्ती केंद्रातील संचालकांनी आणि त्याच्या सहकार्‍यांनी केलेल्या मारहाणीत माझ्या मुलाचा मृत्यू झाल्याच आरोप पालकांनी केला. त्याची दखल घेत मुंब्रा पोलिसांनी नशामुक्ती केंद्राचे व्यस्थापक मुबीन ताडे, इकबाल काझी आणि सहाय्यक रईस खान या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे.

बरकत मंझील, देवरीपाडा रोड, कौसा मुंब्रा येथे राहणारे मोहम्मद शमीम खान यांचा मुलगा नईम. 2015 पासून नईम हा बटण आणि कोरेक्स सारख्या नशेच्या अधीन गेला होता. त्याने सुधारावे म्हणून ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटल, टिटवाळा नशामुक्ती केंद्र, कर्जत येथील सनराईज फाउंडेशनच्या नशामुक्ती केंद्र, येथे उपचारासाठी दाखल केले होते.2018च्या मे महिन्यामध्ये उपचार घेऊन नईम खान घरी आला. मात्र काही महिन्यानंतर त्याने पुन्हा नशेचे सेवन सुरु केले. म्हणून त्याला पुन्हा 15 मार्च रोजी मुंब्रा बायपास येथील अल तायेबिन व्यसन मुक्ती केंद्रात दाखल केले. 16 मार्च रोजी संचालक मुबीन ताडे यांनी फोन करून डॉक्टरांसाठी 6 हजार मागितले. ते 17 मार्च रोजी खान यांनी दिले. 18 मार्चला नईम याला बघण्यासाठी ताडे याना फोन केल्यानंतर नईम हा व्यसनमुक्ती केंद्रात पडला. डोक्याला दुखापत झाली. त्याला कळवा शिवाजी महाराज रुग्णालयात नेले आहे. तुमची गरज भासल्यास बोलावू, असे ताडे यांनी सांगितले. याबाबत नईम याचा मेहुणा युनूस याने कळव्यातील रुग्णालयात चौकशी केली असता नईम याचा मृत्यू झाल्याचे समजले.

- Advertisement -

19 मार्च रोजी नईमच्या शवाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्या मृतदेहावर मारहाणीच्या खुणा मनगटावर, दोन्ही खांद्यावर काळसर खुणा होत्या तर पायावर, कमरेवर मारहाणीचे काळे पट्टे आढळले. तर शवविच्छेदनाच्या अहवालात डोक्यास जखम झाल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मृतक नईम याच्या डोक्याला दुखापत झाल्यानंतरही गंभीरतेने त्याच्यावर उपचार करण्यात आले नाही. म्हणून मृत्यू झाला असल्याचा आरोप करीत शमीम खान यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात नशामुक्ती केंद्राचे संचालक आणि सहकार्‍यांवर गुन्हा दाखल केला. दरम्यान घटनेनंतर पोलिसांनी ही आकस्मिक निधनाची नोंद केली होती. पण फिर्यादी आणि स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्यात धडक दिल्यानंतर अखेर पोलिसांनी 20 मार्च रोजी रात्री गुन्हा दाखल करून ताडे याला अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -