महाराष्ट्राच्या अप्सरेचा ‘तमाशा लाईव्ह’ व्हिडिओ चर्चेत

संजय जाधव दिग्दर्शित 'तमाशा लाईव्ह' या चित्रपटाचा टिझर आजच्या अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित झालाय. टिझर ची सुरुवातच एक मुलीच्या आर्त किंकाळीने होते. आणि त्या पाठोपाठच एक मुलगी एका उंच इमारतीवरून खाली पडताना दिसते.

महाराष्ट्राची अप्सरा अशी ओळख लाभलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या ‘तमाशा लाईव्ह’ या आगामी चित्रपटाचा टिझर आजच्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आला आहे. आणि हा चित्त थरारक टिझर सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. दिग्दर्शक संजय जाधव यांचा ‘तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील नांदी हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं आणि आत्ता या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झालाय त्याला हि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय.

संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटाचा टिझर आजच्या अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित झालाय. टिझर ची सुरुवातच एक मुलीच्या आर्त किंकाळीने होते. आणि त्या पाठोपाठच एक मुलगी एका उंच इमारतीवरून खाली पडताना दिसते. आणि त्या नंतर सिद्धार्थ जाधव स्क्रिन वर दिसतो आणि ” कुणी पडला ना कि बातमी रंगतेच मग ते तोंडावर पडू दे, जमिनीवर पडू दे नाहीतर लोकांच्या नजरेत सिद्धार्थ चं हे वाक्य प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा आणतं. आणि संपूर्ण टिझर मध्ये सोनाली कुलकर्णी आणि सचित पाटील हेच वाक्य बोलताना दिसत आहेत. पण हि दोघ नेमकं कुणाबद्द बोलतायत ? आणि कोणत्या दगडाला शेंदूर फासला जाणार आहे? आणि हे नेमकं काय आहे या बद्दलच्या सगळ्या गोष्टींचा खुलासा हा २४ जून रोजी होणार आहे कारण हा चित्रपट पुढल्या महिन्यात म्हणजेच जून मध्ये २४ तारखेला चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.

त्याचबरोबार ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात सचित आणि सोनालीचा धमाकेदार डान्सही पाहायला मिळणार आहे. यात पाश्चिमात्य नृत्यासोबतच महाराष्ट्राच्या लोककलेचा दमदार ठसका असून नृत्याला दिलेले हे आधुनिक रूप ही या चित्रपटाची खासियत आहे.प्लॅनेट मराठी आणि माऊली प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात सहनिर्मिती ‘तमाशा लाईव्ह’ची कथा मनीष कदम यांनी लिहिली आहे. तर संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. अमितराज, पंकज पडघन यांनी या चित्रपटाला संगीत दिलंय तर चित्रपटातील गाणी क्षितिज पटवर्धन यांनी लिहिली आहेत . या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, भरत जाधव या उत्तम कलाकारांची फळी आहे. येत्या २४ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तमाशा लाईव्ह या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, ” ‘तमाशा लाईव्ह’च्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण कलाकृती प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. चित्रपटात अतिशय अनुभवी असे कलाकार, उत्तम संगीतकार आहेत. हा एक संगीतमय चित्रपट असला तरी त्याला आधुनिकतेची जोड आहे.” या चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता ताणली गेल्याचं पाहायला मिळत आहे. आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यावर सुद्धा तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.