IPL 2022 : ‘या’ स्टेडियममध्ये होणार आयपीएलची फायनल

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) अंतिम सामान्याचे ठिकाण अखेर निश्चित झालं आहे. नुकतंच बीसीसीआयकडून प्लेऑफचे सामने आणि अंतिम सामना कुठे होणार हे सांगण्यात आलं आहे.

photo gallery umran malik kuldeep sen yash dayal mukesh vaibhav arora young indian fast bowler ipl 2022
इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) माध्यमातून दरवर्षी अनेक युवा खेळाडू भारतीय संघात पदार्पणाची संधी उपलब्ध होते. आयपीएलही टी-२० मालिका असली, तरी देशभरातील अनेक युवा क्रिकेट खेळाडूंसाठी स्पर्धेचे स्वरूप आहे. अनेक खेळाडू हे या स्पर्धेतून आपली खेळी दाखवत असतात. त्यानुसार यंदाही आयपीएलमध्ये भारतातील युवा खेळाडू उत्तम कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यंदाच्या आयपीएलमध्ये युवा गोलंदाजांचा दरारा पाहायला मिळत आहे.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) अंतिम सामान्याचे ठिकाण अखेर निश्चित झालं आहे. नुकतंच बीसीसीआयकडून प्लेऑफचे सामने आणि अंतिम सामना कुठे होणार हे सांगण्यात आलं आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबत माहिती दिली असून प्लेऑफचे सामने कोलकाता आणि अहमदाबाद याठिकाणी होणार असून अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, अंतिम सामना 29 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडणार आहे. तर क्वॉलीफायर 2 सामनाही येथेच 27 मे रोजी होणार आहे. तर कोलकात्याच्या (Kolkata) येथील ईडन गार्डन्स (Eden Gardens) येथे क्वॉलीफायर 1 आणि एलिमिनेटर सामना अनुक्रमे 24 आणि 25 मे रोजी पार पडेल.

राजस्थान, हैदराबाद, दिल्ली, पंजाब आणि बंगळुरु या संघामध्ये पुढील फेरीत पोहचण्याची चुरस आहे. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत 6 सामने जिंकत प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. तसंच सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरु संघाने प्रत्येकी 5-5 सामने जिंकत ते देखील पुढील फेरीत पोहचण्याच्या जवळ आले आहे. तर या शर्यतीत सर्वात मागे दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स असून त्यांनी 4-4 सामनेच केवळ जिंकले आहेत. त्यामुळे या उर्वरीत संघाना शक्य तितके अधिक सामने जिंकून पुढील फेरीत पोहचण्याची संधी आहे.


हेही वाचा – Weight Lifting : पुण्याच्या हर्षदा गरुडची उंच झेप, जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक