Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई नाताळला उलगडणार तेलगीचे रहस्य; वेब सिरीज प्रदर्शनला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार

नाताळला उलगडणार तेलगीचे रहस्य; वेब सिरीज प्रदर्शनला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार

Subscribe

बनावट स्टॅप घोटाळा उघड झाल्यानंतर देशभर खळबळ उडाली होती. याप्रकरणी तेलगीला अटक झाली. तेलगीविरोधात विशेष न्यायालयात खटला चालला. तपास यंत्रेणेने तेलगीविरोधात सबळ पुरावे सादर केले. त्याआधारावर न्यायालयाने तेलगीला ३० वर्षांची शिक्षी ठोठावली. शिक्षा भोगत असताना २०१७ साली तेलगीची मृत्यू झाला. 

मुंबईः बनावट स्टॅम्प घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगी याच्या जीवनावर आधारीत वेब सिरीजच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास शुक्रवारी मुंबईतील नगर दिवाणी न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे ‘स्कॅम 2003: द क्यूरियस केस ऑफ अब्दुल करीम तेलगी’ ही वेब सिरीज रविवारी नाताळच्या दिवशी प्रदर्शित होईल.

कोट्यवधी रुपयांचा बनावट स्टॅम्प घोटाळा २००३ मध्ये उघडकीस आला. अब्दुल करीम तेलगी हा  बेळगाव जिल्ह्यातील खानापूर स्टेशन रोड येथील रहिवासी. अब्दुल करिम तेलगी आणि त्याच्या भावांनी नाशिक येथे बनावट स्टॅपचा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायाला पाकिस्तान आणि बांगलादेश या ठिकाणावरून देखील छुपे पाठबळ मिळत होते, असा आरोप होता.

- Advertisement -

बनावट स्टॅप घोटाळा उघड झाल्यानंतर देशभर खळबळ उडाली होती. याप्रकरणी तेलगीला अटक झाली. तेलगीविरोधात विशेष न्यायालयात खटला चालला. तपास यंत्रेणेने तेलगीविरोधात सबळ पुरावे सादर केले. त्याआधारावर न्यायालयाने तेलगीला ३० वर्षांची शिक्षी ठोठावली. शिक्षा भोगत असताना २०१७ साली तेलगीचा मृत्यू झाला.

हर्षद मेहताप्रमाणे तेलगीचे जीवनही वादग्रस्त ठरले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वच तेलगीच्या घोटाळ्याने थक्क झाले. त्यामुळे त्याच्या जीवनावर वेब सिरीज तयार करण्यात आली. ही वेब सिरीज २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या वेब सिरीजच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी, अशा मागणी करणारा दावा तेलगीची मुलगी सना ईरफान यांनी दिवाणी न्यायालयात केला होता.

- Advertisement -

एका पुस्तकाच्या आधारावर ही वेब सिरीज तयार करण्यात आली आहे. ही वेब सिरीज तयार करताना तेलगी कुटुंबियांची परवानगी घेतलेली नाही. या वेब सिरीजमुळे तेलगी कुटुंबाचीही बदनामी होईल. त्यामुळे या वेब सिरीजच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी, अशी मागणी सना यांनी केली होती. त्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे या वेब सिरीजच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोट्यावधी रूपयांच्या या घोटाळ्यातील अन्य सर्व आरोपींची डिसेंबर २०१८ मध्ये पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. नाशिक जिल्हा न्यायालयाने हा निकाल दिला. बनवाट स्टॅप घोटाळा हा ३२ हजार कोटींचा होता. त्यामध्ये ४९ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली होती. २००३ पासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. अखेर १५ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी हा निकाल दिला. ह

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -