घरमुंबईशाळांमध्ये तात्पुरत्या नेमणुका करण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना

शाळांमध्ये तात्पुरत्या नेमणुका करण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना

Subscribe

मुंबई महापालिकेतील शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांना ११ ते १७९ दिवसांपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात नेमण्याचे अधिकार आता संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना बहाल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर शाळेशी संबंधित विविध संगणकीय कामे करण्यासाठी ‘डेटा एन्ट्री ऑपरेटर’ची दर महिन्याला ५ दिवसांकरता नेमणूक करणे, शाळेच्या ग्रंथालयात स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची खरेदी, प्रयोगशाळा आणि क्रीडा साहित्य खरेदी, संगणक-फर्निचर दुरुस्ती, इंटरनेट जोडणीचा खर्च, विविध शालेय उपक्रम इत्यादींसाठी खर्च करण्याचेही अधिकार आता मनपा शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्याची माहिती महापालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली आहे.

गुणवत्तेवरील परिणाम टाळणं शक्य

भारतीय भाषांमधून सातत्याने ज्ञानयज्ञ सुरू असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या १,१०० शाळांमधून तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून १० हजारांपेक्षा अधिक शिक्षक या विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम अविरतपणे करत आहेत. परंतु, काही वेळा या शिक्षकांना वैद्यकीय वा प्रसूती विषयक कारणांसाठी मोठ्या रजेवर जावे लागते. या प्रकारच्या आव्हानांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर नकळत परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेऊन तात्पुरत्या स्वरुपात नेमणुका करण्याचे अधिकार शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.

- Advertisement -

ठराव मंजूर करून घेणं आवश्यक

महापालिका शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक व्यापक व्हावी, यादृष्टीने महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी महापालिका शाळांच्या मुख्याध्यापकांना विशेष अधिकार बहाल करणारे एक विशेष परिपत्रक नुकतेच जारी केले आहे. त्या परिपत्रकाची अंमलबजावणी आता करण्यात येत आहे. मनपा शाळांमधून किंवा अनुदानित शाळांमधून निवृत्त झालेल्या शिक्षकाची तात्पुरत्या स्वरुपात व किमान वेतनानुसार अधिकाधिक १७९ दिवसांपर्यंत नेमणूक करता येणार आहे. या प्रकारच्या नेमणुकीचा ठराव शाळा व्यवस्थापन समितीमध्ये (एसएमसी)मध्ये मंजूर करून घ्यावयाचा असून अशी नेमणूक करताना मुख्याध्यापकांनी काय काळजी घ्यावी? याबाबतची सविस्तर माहिती संबंधित परिपत्रकात देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -