घरताज्या घडामोडीTerror Module: महाराष्ट्र ATSकडून अजून एक संशयित दहशतवादी ताब्यात

Terror Module: महाराष्ट्र ATSकडून अजून एक संशयित दहशतवादी ताब्यात

Subscribe

महाराष्ट्र एटीएस (Maharashtra ATS) आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Police Crime Branch) एकत्रितपणे दहशतवादी मॉड्यूलसंबंधित (Terror Module) मुंबईतील जोगेश्वरी येथे कारवाई केली असून या कारवाईत शुक्रवारी रात्री जोगेश्वरीतून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे कनेक्शन दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांसोबत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेला व्यक्तीचे अंडरवर्ल्ड शी संबंध असून जान मोहम्मद याचा हँडलर असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र एटीएसने दिली आहे.

- Advertisement -

या आठवड्यात मंगळवारी १४ सप्टेंबरला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तान संघटित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयद्वारे प्रशिक्षित दहशतवाद्यांसह ६ जणांना अटक केली. येत्या सणासुदीच्या दिवसांत या दहशतवाद्यांनी देशातील काही ठिकाणी हल्ला करण्याचा कट रचला होता. पण दिल्ली पोलिसांनी हा कट उधळून लावला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्डचा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा पाकिस्तानमध्ये असलेला भाऊ अनीस इब्राहिम देशात दहशतवादी हल्ला करण्यासाठी अटक असलेल्या सहा जणांना छुप्या पद्धतीने मदत करत होता. हे दहशतवादी मॉड्यूल अंडरवर्ल्ड आणि पाक-आयएसआय प्रशिक्षित होते.

- Advertisement -

या सहा या दहशतवाद्यांमध्ये महाराष्ट्रातील जान मोहम्मद शेख, दिल्ली जामियानगरचा ओसामा ऊर्फ सामी, उत्तर प्रदेश मधील रायबरेलीचा मूलचंद ऊर्फ लाला आणि बहराइच, उत्तर प्रदेशचा मोहम्मद अबू बकर, मोहम्मद आमिर जावेद आणि झिशान कमर यांचा समावेश आहे. या सर्व संशयित दहशतवाद्यांची १४ दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. सध्या या सर्वांशी संबंधित असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले जात आहे.


हेही वाचा – Terrorist: पाकिस्तानला पुरवत होता भारतीय लष्कराची गुप्त माहिती, राजस्थानमधून एकाला अटक


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -