घरमुंबईमुंब्र्यातील अनधिकृत व्यावसायिक गाळ्यांवर पालिकेचा हातोडा

मुंब्र्यातील अनधिकृत व्यावसायिक गाळ्यांवर पालिकेचा हातोडा

Subscribe

ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निष्काषन विभागाकडून आज मुंब्र्यातील अनधिकृत व्यावसायिक गाळ्यांवर धडक कारवाई करत ६४० अनधिकृत स्टॉल्स आणि ४५ व्यावसायिक गाळे जमीनदोस्त करण्यात आले आहेत.

ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निष्काषन विभागाच्या विविध सात पथकांच्या साहाय्याने आज (मंगळवारी) मुंब्रा येथे करण्यात आलेल्या कारवाईमध्ये गुलाब मार्केटसह जवळपास ६४० अनधिकृत स्टॉल्स आणि ४५ व्यावसायिक गाळे बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

४५ व्यावसायिक गाळे जमीनदोस्त

महापालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार आज सकाळी मुंब्रा रेल्वे स्टेशन ते वाय जंक्शनपर्यंत दोन्ही बाजूंनी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी सर्व उपायुक्तांच्या अधिपत्याखाली सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, उप अभियंता यांचा समावेश असलेली सात विविध पथके तयार करण्यात आली होती. या पथकांच्या साहाय्याने सकाळी मुंब्रा रेल्वे स्टेशनपासून कारवाईला सुरूवात झाली. या कारवाईमध्ये संपूर्ण गुलाब मार्केट जमीनदोस्त करण्याबरोबरच रस्त्यावरील स्टॉल्स बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर एमएम व्हॅली, अमृतनगर, बॉम्बे कॉलनी या परिसरात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये जवळपास ४५ व्यावसायिक गाळे तोडण्यात आले आहेत. ही कारवाई उपायुक्त (अतिक्रमण व निष्काषन) अशोक बुरपल्ले यांच्या समन्वयातून उपायुक्त संदीप माळवी, मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त महादेव जगताप, शंकर पाटोळे, मारूती गायकवाड, सचिन बोरसे, झुंझार परदेशी, विजयकुमार जाधव, महेश आहेर यांच्या पथकांनी ८ जेसीबी, १० डंपर आणि जवळपास २०० कामगारांनी पोलिसांच्या कडक बंदोबस्तात केली आहे.

- Advertisement -

वाचा – देवनार डम्पिंग ग्राउंडवरील झोपड्यांचा विळखा सुटला, १२७ झोपड्या जमीनदोस्त


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -