घरमुंबईवसईत रंगणार 5 वे श्रीमंत चिमाजी अप्पा साहित्य संमेलन

वसईत रंगणार 5 वे श्रीमंत चिमाजी अप्पा साहित्य संमेलन

Subscribe

शब्दवेल साहित्य प्रतिष्ठान आयोजित पाचवे राज्यस्तरीय नरवीर चिमाजी अप्पा साहित्य संमेलन 16 डिसेंबरला वसईत होणार आहे.वसई-पारनाक्यावरील काँग्रेस भवनात हे संमेलन होणार असून त्यात ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांची मांदियाळी असणार आहे. 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिका, पत्रकार प्रतिमा जोशी संमेलनाध्यक्ष असणार आहेत. तर महाराष्ट्र महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे या स्वागताध्यक्ष असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर रुपेश जाधव, ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे, पोलीस उपमहानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर, सारेगमप फेम गायिका सावनी रविंद्र,कवि संमेलनाध्यक्ष साहेबराव ठाणगे, बहुभाषिक कवि संमेलनाध्यक्ष रमेश यादव आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.या संमेलनात दिमाखदार मुलाखत, सांगितीक गप्पा, बहारदार काव्यमैफिल, बहुभाषिक काव्य कट्टा अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध निवेदक रसिकांशी सुसंवाद साधणार आहेत. उद्घाटन आणि समारोपासह एकूण पाच सत्रात हे संमेलन रंगेल, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा डॉ.पल्लवी परुळेकर-बनसोडे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -