घरमुंबईसाचलेल्या पाण्यात भाजप प्रवक्त्यांचे बुट हातात

साचलेल्या पाण्यात भाजप प्रवक्त्यांचे बुट हातात

Subscribe

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांची पूर्वनियोजित पत्रकार परिषद रद्द करावी लागली पण दादरमधून त्यांना पुढील इच्छितस्थळी जाताना गुडघाभर पाण्यातून वाट काढत चालावे लागले.

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांची पूर्वनियोजित पत्रकार परिषद रद्द करावी लागली पण दादरमधून त्यांना पुढील इच्छितस्थळी जाताना गुडघाभर पाण्यातून वाट काढत चालावे लागले. मुंबईतील रस्त्यात खड्डे, त्यात पावसाच्या पाण्यात बुडालेले रस्ते,अशा बिकट परिस्थितीतून मार्गक्रमण करताना पात्रा यांचे पायातील बूट निखळून कधी त्यांच्या हातात आले हे त्यांनाही कळले नाही. अशा अवस्थेत पात्रा यांना प्रवक्ते केशव उपाध्ये हे पाण्यातून मार्ग काढत पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतानाचा फोटो सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडत असल्यामुळे मुंबईकर बेहाल झाले आहेत.अनेक सखल भागांत पाणी साचल्याने मुंबईच्या रस्त्यांवरून लोकांना वाट काढतानासुध्दा मुश्कील झाले आहे. मुंबईकरांना सहन कराव्या लागणार्‍या या त्रासापासून भाजपचे प्रवक्तेदेखील वाचू शकले नाहीत. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा आणि केशव उपाध्ये हेदेखील दादरच्या रस्यांवरून वाट काढताना चांगलेच पाण्यात अडकले. पाण्यातून वाट काढताना अडचण होत होती म्हणून भाजपचे नेते संबित पात्रा यांना पायातील बूट हातात घेवून वाट काढावी लागली.

- Advertisement -

पावसामुळे नियोजित पत्रकार परिषद रद्द

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांची मंगळवारी पत्रकार परिषद होती, परंतु पावसामुळे ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. याचा परिणाम वाहतुकीवर झाला असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -