घरदेश-विदेशखोट्या बातम्या रोखण्यासाठी युट्युबची २.५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक

खोट्या बातम्या रोखण्यासाठी युट्युबची २.५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक

Subscribe

ब्रेकिंग न्यूजच्या बाबतीत सर्वात जास्त काळजी घेण्यात येणार असून चुकीची माहिती पसरू नये यासाठी युट्यूबनं पाऊल उचलंल असून २.५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

गुगलची व्हिडिओ प्लॅटफॉर्म कंपनी युट्युबनं खोट्या बातम्या आणि भ्रामक सूचनांना रोख लावून सत्यता पडताळणीसाठी पाऊल उचललं आहे. शिवाय या संकटांना सामोरं जाण्यासाठी कंपनीनं २.५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. युट्यूबनं ही माहिती दिली असून बातम्यांचे स्रोत अधिक विश्वसनीय बनतील अशी ग्वाही दिली आहे. ब्रेकिंग न्यूजच्या बाबतीत सर्वात जास्त काळजी घेण्यात येणार असून चुकीची माहिती पसरू नये यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

व्हिडिओद्वारे मिळणार माहिती

युट्यूब व्हिडिओ सर्चमध्ये व्हिडिओ आणि त्यासंबंधित बातमीचं छोटसं स्पष्टीकरण युट्यूब दाखवायला सुरुवात करणार आहे. तसंच याबरोबर या बातम्यांमध्ये बदल होऊ शकतो अशा प्रकारची सूचनादेखील देण्यात येईल. खोट्या व्हिडिओंना आळा बसावा हाच यामागील उद्देश असल्याचं युट्यूबनं स्पष्ट केलं आहे. गोळीबारी, नैसर्गिक आपत्ती अथवा इतर प्रमुख घटनांच्या बाबतीत खोट्या बातम्या वेगाने पसरतात. त्यावर रोख लावण्यासाठी युट्यूबनं ही गुंतवणूक करण्याचा विचार केला आहे.

- Advertisement -

२.५ कोटी डॉलर्सची होणार गुंतवणूक

युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर खोट्या बातम्यांवर रोख लावण्यासाठी काही वर्षांमध्ये २.५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार आहे. यामध्ये जगभराच्या बातम्या असून ‘टिकाऊ आणि चांगला व्हिडिओ परिचालन’ स्थापित करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. तसंच व्हिडिओ प्रॉडक्शन सुधारण्यासाठीदेखील प्रयत्न करण्यात येतील असं युट्यूबनं सांगितलं आहे. याशिवाय कंपनी विकीपीडिया आणि एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिकासारख्या सामान्य विश्वसनीय सुत्रांसह वादात्मक व्हिडिओपासून दूर राहण्यासाठी काय करता येईल परीक्षण करत आहे. यावर अजून बरंच काम करायचं शिल्लक आहे असंही युट्यूबनं स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -