घरमुंबईमुंबईत शंभर ठिकाणी होणार 'या' उद्यानांची निर्मिती

मुंबईत शंभर ठिकाणी होणार ‘या’ उद्यानांची निर्मिती

Subscribe

मियावाकी पध्दतीच्या या उद्यानांसाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू असून उर्वरीत ४० उद्यानांची निर्मिती ‘सीएसआर’अंतर्गतच केली जाणार आहे.

मुंबईतील पाच ठिकाणच्या मोकळ्या जागांवर शहरी वने विकसित करत मियावकी पध्दतीने उद्याने बनवण्याचा संकल्प करणार्‍या महापालिकेने आता अशाप्रकारची तब्बल १०० उद्यानांची निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यापैकी ६० ठिकाणी मियावाकी पध्दतीने वने विकसित करण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरु असून उर्वरीत ४० ठिकाणच्या उद्यानांची निर्मिती ‘सीएसआर’ अंतर्गत केली जाणार आहे. मुंबईत पर्यावरणाच्यादृष्टीने ‘मियावाकी’ पद्धतीची १०० वने उभारण्याचे लक्ष्य महापालिका प्रशासनाने ठेवले आहे. सामान्य उद्यानांच्या किंवा वनांच्या तुलनेत मियावाकी पद्धतीने विकसित करण्यात येणाऱ्या वनांमधील झाडे ही अधिक वेगाने वाढतात.

एरवी सामान्य पद्धतीने लावलेले झाड वाढण्यास जेवढा कालावधी लागतो. त्यापेक्षा साधारणपणे निम्म्यापेक्षा कमी कालावधीत तेवढ्याच उंचीचे झाड वाढते. तसेच साधारणपणे २ वर्षात विकसित होणाऱ्या मियावाकी पद्धतीच्या वनांमध्ये झाडांमधील अंतर हे कमी असल्याने ती घनदाट असतात.

- Advertisement -

१०० ठिकाणी बनवण्यात येणार्‍या मियावाकी पद्धतीच्या उद्यानांपैकी ६० ठिकाणी विकसित करण्यात येणाऱ्या मियावाकी वनांसाठी लवकरच निविदा मागविण्यात येणार आहेत. तर उर्वरित ४० ठिकाणी ‘सीएसआर’ अंतर्गत मियावाकी वने विकसित करावयाचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी स्पष्ट केले. या अनुषंगाने इच्छुक कंपन्यांना किंवा संस्था समोर आल्यास त्यांचा विचार करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ज्याठिकाणी मियावाकी पद्धतीची वने विकसित करण्यात येतील. ती वने महापालिकेच्याच मालकीची असल्याने त्याठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश मोफत असेल, असे त्यांनी सांगितले. मात्र महापालिकेने उद्याने, मैदान इत्यादींबाबत प्रस्तावित केलेल्या धोरणाचा या मियावाकी पद्धतीच्या वनांशी संबंध नसून दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत,असल्याचेही परदेशी यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -