घरमुंबईवन रुपी क्लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुले यांना धमक्या; स्वत: ट्विट करून...

वन रुपी क्लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुले यांना धमक्या; स्वत: ट्विट करून दिली माहिती

Subscribe

डॉ.घुले यांनी स्वतःच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्विट करून राजकीय एजंट यांच्याकडून माझ्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच मी लवकरच मुंबई कायमचे सोडून कुटुंबासह दिल्ली येथे राहण्यास जात असल्याचे डॉ.घुले यांनी ट्विट केले आहे.

वन रुपी क्लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुगे यांच्या जीवाला धोका असल्याच्या ट्विटने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. डॉ.घुले यांनी स्वतःच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्विट करून राजकीय एजंट यांच्याकडून माझ्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच मी लवकरच मुंबई कायमचे सोडून कुटुंबासह दिल्ली येथे राहण्यास जात असल्याचे डॉ.घुले यांनी ट्विट केले आहे. या प्रकरणी डॉ.घुले यांनी अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार केलेली नाही.

रेल्वेत होणारे अपघात तसेच इतर घटनांमध्ये प्रवाशांना तात्काळ प्राथमिक उपचार मिळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रत्येक महत्वाच्या रेल्वे स्थानकावर ‘वन रुपी क्लिनिक’ची स्थापना केली होती. अल्पावधीत वन रुपी क्लिनिक नावारूपाला आले. डॉ. राहुल घुले यांचे असणारे वन रुपी क्लिनिकचे मुख्य उपचार केंद्र ठाणे रेल्वे स्थानकाला लागून आहे. डॉ.राहुल घुले हे स्वत: या क्लिनिकमध्ये रुग्णांवर उपचार करतात. कोरोनाच्या काळात वन रुपी क्लिनिकने कल्याण, डोंबिवली महानगरपालिकांच्या व इतर कोविड सेंटरमध्ये काम सुरू केले होते. वन रुपी क्लिनिकच्या कामामुळे नावारूपाला आलेले डॉ. राहुल घुले यांनी रविवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करून माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, काही राजकारण्यांचे एजंट आपल्याला धमकावत असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. हे ट्विट त्यांनी पंतप्रधान यांना टॅग केले आहे. डॉ.घुले यांनी केलेल्या ट्विटमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर त्यांनी दुसरे ट्विट करून ‘मी माझ्या कुटुंबियांसह मुंबई कायमची सोडून दिल्ली येथे स्थायिक होत असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

याप्रकरणी डॉ. राहुल घुले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही, त्यांना संदेश द्वारे विचारणा केली असता मी सध्या दिल्लीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. डॉ. राहुल घुले यांना ठाण्यातील क्लिनिकमध्ये असताना धमकीचा फोन आला होता. त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डॉ. घुले यांना कोण धमकावत आहे, धमकी देणारे राजकीय एजंट कोण याबाबत काहिही कळू शकलेले नाही. याबाबत अद्याप कुठल्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -