घरCORONA UPDATEशीव रुग्णालयातील घडलेला प्रकार चुकीचाच महापौरांची कबुली 

शीव रुग्णालयातील घडलेला प्रकार चुकीचाच महापौरांची कबुली 

Subscribe

शीव रुग्णालयात जे घडले ते गंभीर असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी कबुल करत कोरोनाबाधित मृतदेहाच्या विल्हेवाटीबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाबाधित रुग्णांच्या शेजारीच मृत्यू पावलेल्या बाधितांचे मृतदेह ठेवले जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे शीव रुग्णालयात जे घडले ते गंभीर असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी कबुल करत कोरोनाबाधित मृतदेहाच्या विल्हेवाटीबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. वार्डमधून कोरोनाबाधित मृतदेहाची विल्हेवाट लवकर लागावी. यासाठीही हे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही मार्गदर्शक सूचना लवकरच निश्‍चित करणार असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या शीव रुग्णालयात कोरोना मृतदेहांच्या बाजूलाच काही रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा प्रकार प्रसारमाध्यमातून प्रसारित झालेल्या चित्रफितीची दखल घेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांच्यासमवेत या रुग्णालयाला भेट देवून या रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर, त्यांनी रुग्णालयात घडलेला प्रकार चुकीचा असून याबाबत आपण चौकशी समिती नेमणार असल्याचे सांगितले.

- Advertisement -

कोरोना बाधित मृतदेहाची विल्हेवाट अर्ध्या तासात लावण्याचे मार्गदर्शक तत्त्वे असून याबाबत डॉ. इंगळे यांनी कमिटीची स्थापना केली आहे. त्यावर ते काम करत असल्याचेही महापौरांनी सांगितले. वार्डमधून कोरोनाबाधित मृतदेहाची विल्हेवाट लवकर लागावी. यासाठीही हे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा मार्गदर्शक सूचना लवकरच निश्‍चित करणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.

कोरोनाबाधितांचे मृतदेह शवागारात वेगळे

कोरोनाचे मृतदेह वेगळे ठेवण्याची व्यवस्था शवागृहात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी दिली. तसेच याप्रकारच्या घटना यापुढे घडू नये व अशा प्रसंगी मृत व्यक्तीचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यास पुढे आले नाही तर महापालिकेने मृतदेहाची विल्हेवाट लावायची का? याबाबत महानगरपालिका धोरण निश्चित करणार असल्याचे महापौरांनी सांगितले. कोरोनाचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांना कळविल्यानंतरही दोन तासात जर आले नाही तर याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे महापौरांनी शेवटी सांगितले. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहांची लवकरच विल्हेवाट लावणे आवश्यक असते. याबाबत राज्य शासनाशी चर्चा सुरू असून याबाबतचा धोरणात्मक निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका लवकरच घेणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -