घरमुंबईमहापौरांनी रस्त्यावर उतरुन केली विना मास्क फिरणाऱ्यांना विनंती

महापौरांनी रस्त्यावर उतरुन केली विना मास्क फिरणाऱ्यांना विनंती

Subscribe

ज्या प्रवाशांनी मास्क घातला नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश

कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यावर राज्यभरात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मुंबईतील लोकलने सर्वसामान्यांना प्रवास करण्यासाठी परवानगीही देण्यात आली आहे. कोरोना नियंत्रणात आल्यावर राज्य सरकारने सर्व अस्थापना आणि उद्योग, हॉटेल सुरु करण्याची परवानगी दिली आहे. परंतु नागरिक कोरोनाचे नियम पाळत नसल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढले आहे. लोकलने प्रवास करणारे प्रवाशी विना मास्कने प्रवास करत आहेत. तसेच नागरिक सार्वजनिक स्थळी आणि लोकलमध्ये सामाजिक अंतराचे पालन करत नाहीत. यामुळे कोरोना पुन्हा आपले हातपाय पसरत आहे. राज्यात आणि मुंबईत मागील काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.सद्यस्थितीत मुंबईतील काही विभागांमध्ये वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता पुन्हा लॉकडाऊनची स्थिती उद्भवू नये याकरिता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दिनांक १७ फेब्रुवारी २०२१ रोजी भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धिम्या गतीच्या लोकलने प्रवास करून नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले. तसेच प्रवाश्यांना कोरोना बाबतच्या त्रिसूत्रीचे महत्व पटवून दिले.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास पुन्हा लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लादण्यात येतील असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तर आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लोकांना मास्क वारपरण्याचे आवाहन केले आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लोकांना मास्क घालण्याचे आवाहन करण्यासाठी स्वतः भायखळा रेल्वे स्थानकात हजर झाल्या आणि नागरिकांना मास्क लावण्यास सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kishori Pednekar (@kishoripednekar)

- Advertisement -

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी भायखळा स्टेशनची पाहणी केली. यावेळी ज्या प्रवाशांनी मास्क घातला नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. भायखळा स्थानकात असलेल्या स्टॉलवरील कर्मचाऱ्यांनीही मास्क घातला नव्हता या कर्मचाऱ्यांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी चांगलेच खडसावले आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी सीएसएमटी स्टेशन ते भायखळा स्थानकापर्यंत प्रवास केला. यावेळी लोकलमधील काही प्रवाशांनी मास्क घातला नसल्याचे आढळून आले.

- Advertisement -

लोकलमध्ये ज्या प्रवाशांनी मास्क घातला नव्हता अशा प्रवाशांना महापौर पेडणेकर यांनी आपल्याजवळील मास्क दिले. तसेच भायखळा स्थानकातील येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना मास्क घालण्याचे आवाहन देखील केले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -