घरमुंबईखड्डे सहन करणारे डोंबिवली हे सर्वात सोशिक शहर !

खड्डे सहन करणारे डोंबिवली हे सर्वात सोशिक शहर !

Subscribe

डोंबिवलीच्या शाळेने स्कूल बसवर लावले बॅनर्स

डोंबिवली शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. सेलिब्रिटींनीही खड्ड्यांविरोधात नाराजी व्यक्त करीत प्रशासनाच्या कारभारावर टीका केली, पण घडाळ्याच्या काट्यावर दिवसाची सुरुवात होणारे डोंबिवलीकर चाकरमनी हे सगळे निमूटपणे सहन करीत आहेत. त्यामुळे डोंबिवलीतील विद्या निकेतन शाळेने चक्क स्कूलबसच्या मागे सोशिक डोंबिवलीकर असा बॅनर्स लावून डोंबिवलीकरांना जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. यातून डोंबिवलीकर जागे होतील का? हाच खरा प्रश्न आहे.

डोंबिवली शहरातील असा एकही रस्ता नाही की त्यावर खड्डे नाहीत. डोंबिवलीच्या रस्त्यावरून रिक्षातून प्रवास करताना जणू काय बोटीतून प्रवास करतो की काय असाच अनुभव सध्या डोंबिवलीकर अनुभवत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या खड्ड्यांची थेट चंद्राबरोबरही तुलना करून सोशल मीडियातून चर्चा झाली. मात्र, खड्ड्यांचा सर्वसामान्यांना त्रास होत असला, तरी ते हे सगळे डोंबिवलीकर निमूटपणे सहन करत आहेत. त्यामुळे डोंबिवली हे सर्वात सोशिक शहर असून डोंबिवलीकर हे सगळे टॉलरेट करणारे सर्वात मोठे सोशिक आहेत, असे उपरोधिक बॅनर्स विद्या निकेतन शाळेने त्यांच्या बसेसच्या मागे लावलेत. या बॅनर्सच्या माध्यमातून डोंबिवलीकरांना कुंभकर्णी झोपेतून जागे करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे शाळेचे संचालक विवेक पंडित यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -