घरदेश-विदेशतोट्यातून बाहेर पडण्यासाठी रेल्वेचा खासगी ट्रेनचा मार्ग

तोट्यातून बाहेर पडण्यासाठी रेल्वेचा खासगी ट्रेनचा मार्ग

Subscribe

येत्या दहा ते पंधरा दिवसात खाजगी ट्रेनसाठी निविदा मागविण्यात येणार आहेत.

रेल्वेला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी तसेच तिचे संपूर्ण पुनर्घटन करण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने १०० मार्गांवर १५० खासगी ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईतून तब्बल २६ खासगी ट्रेन चालविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या ट्रेन चालविण्यासाठी अर्थ मंत्रालयाच्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अॅप्रिशीयल कमिटीने (पीपीपीएसी)ने १९ डिसेंबर रोजीच या निर्णयाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या दहा ते पंधरा दिवसात खासगी ट्रेनसाठी निविदा मागविण्यात येणार आहेत.

या खाजगी ट्रेन धावणार

या निर्णयानुसार मुंबई ते पुणे, मुंबई ते नागपूर, नागपूर ते पुणे, मुंबई ते चेन्नई, मुंबई ते वाराणसी, मुंबई ते लखनौ, पुणे ते पाटणा, चेन्नई ते कोईम्बतूर, चेन्नई ते सिकंदराबाद, सुरत ते वाराणसी, भुवनेश्वर ते कोलकाता, मुंबई ते कोलकाता, मुंबई ते गुवाहटी, नवी दिल्ली ते मुंबई, नवी दिल्ली ते कोलकाता, नवी दिल्ली ते बंगळुरू, नवी दिल्ली ते चेन्नई, कोलकाता ते चेन्नई, चेन्नई ते जोधपूर या मार्गांवर खासगी ट्रेन चालविण्यात येतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

- Advertisement -

मेट्रो शहरांसह या मार्गावर देखील खाजगी ट्रेन

देशातील मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या मेट्रो शहरांसह नॉन मेट्रो शहरांमध्ये देखील खासगी ट्रेन चालविण्यात येणार आहे. दरम्यान मुंबईत २६ मार्गांवर, नवी दिल्लीत ३५ मार्ग, कोलकातामध्ये १२ मार्ग तर चेन्नईमध्ये ११ मार्ग आणि बंगळुरूमध्ये ८ मार्गांवर खासगी ट्रेन धावणार आहे. त्याशिवाय गोरखपूर-लखनौ, कोटा-जयपूर, चंदिगड-लखनौ, विशाखापट्टणम-तिरुपती, नागपूर-पुणे या मार्गांवर देखील खासगी ट्रेन चालविण्यात येणार आहे.

हेही वाचा – २०१९ या वर्षात ९ हजार ९५६ अपघात!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -