घरताज्या घडामोडीपहाटे घराबाहेर बोलवून त्याने टेलर सादिकला गोळ्या घातल्या कारण...

पहाटे घराबाहेर बोलवून त्याने टेलर सादिकला गोळ्या घातल्या कारण…

Subscribe

घरात झोपलेल्या इसमाला पहाटेच्या सुमारास बाहेर बोलावून त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास चेंबूर येथील अमीर बाग येथे घडली. या गोळीबारात जखमी झालेल्या इसमाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी टिळक नगर पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे.

सादिक इनायत खान (३६) असे जखमीचे नाव आहे. सादिक याचा टेलरिंगचा व्यवसाय असून तो चेंबूर, अमीर बाग येथील वझीर बाबा चाळ येथे पत्नीसोबत राहण्यास आहे. गुरुवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्याच परिसरात राहणारा नवनीतसिंग राणा हा सादिकच्या घराजवळ येऊन त्याने जोरजोराने दार ठोठावले असता सादिक याने दार उघडताच नवणीतसिंग याने स्वतःकडे असलेल्या रिव्हॉल्वर मधून सादिकवर २ गोळ्या झाडून पळ काढला. या गोळीबारात सादिक हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या पाठीत आणि उजव्या हाताच्या पंजाला गंभीर जखम झाली.त्याला पत्नी मेहरूंनीसा हिने शेजाऱ्याच्या मदतीने सायन रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलिसांनी नवनीतसिंग राणा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार नवनीतसिंग राणा यांच्यावर महिन्याभरापूर्वी सादिकचा मेहुणा सलीम शेख याने तलवारीने वार केले होते, त्याचा सूड घेण्यासाठी नवनीतसिंग याने सादिकवर हल्ला केल्याची माहिती पुढे येत आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – कोळसा खाणींचा आज लिलाव, २ लाखांहून अधिक रोजगार होणार उपलब्ध!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -