घरमुंबईवरळी सी-लिंकवरून त्याने मारली उडी

वरळी सी-लिंकवरून त्याने मारली उडी

Subscribe

टॅक्सीचालकाला टॅक्सी थांबवण्यास सांगून पार्थने समुद्रात उडी मारली.

वांद्रे-वरळी सी-लिंकवरून टॅक्सीतून प्रवास करणाऱ्या एका तरूणाने टॅक्सीचालकास टॅक्सी थांबवण्यास सांगून सी-लिंकवरून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पार्थ सोमाणी (२५) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. सायंकाळी उशीरापर्यंत तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर त्या तरूणाचा शोध घेत होते.

मुलुंडमध्ये राहणारा पार्थ एका सीए फर्ममध्ये नोकरी करत होता. आज दुपारी वरळीकडून वांद्र्च्या दिशेने पार्थ टॅक्सीने प्रवास करत होता. मात्र अचानक पार्थने मध्येच टॅक्सीचालकाला टॅक्सी थांबवण्यास सांगितली. त्यानंतर टॅक्सीतून उतरत त्याने समुद्रात उडी घेतली.

- Advertisement -

हेही वाचा – राज्याच्या पर्यटन नकाशावर दिसणार ‘या’ संस्थेचे संग्रहालय

वरळी सी लिंकवर समुद्रात तरुणाची आत्महत्या

वरळी सी लिंकवर समुद्रात तरुणाची आत्महत्या

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಜುಲೈ 12, 2019

उद्या पुन्हा शोधकार्य

त्यानंतर तात्काळ तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर घटनास्थळी दाखल झाले. पार्थला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. सायंकाळी ६.१५ वाजले तरी पार्थचा शोध लागला नाही. दरम्यान सूर्यास्ताची वेळ झाल्याने शोध थांबवण्यात आला. उद्या सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -