घरमुंबईऑनलाइन शाळा सुरू करण्याबाबत आदेश निघालाच नाही

ऑनलाइन शाळा सुरू करण्याबाबत आदेश निघालाच नाही

Subscribe

पालक- शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कायम असताना १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ सुरू करण्याची घोषणा शिक्षण विभागाने केली आहे. मात्र ऑनलाइन शिक्षणाबाबत कोणत्याही सूचना शिक्षण विभागाकडून शाळांना देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत शाळा प्रशासन संभ्रमात पडले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने मार्चपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शाळांकडून विद्यार्थांना व्हॉटस् अ‍ॅप, यूट्यूब आदी माध्यमातून शिक्षण देत आहेत. परंतु शिक्षण विभागाने याबाबत शाळांना स्पष्ट लेखी सूचना दिल्या नाहीत. शिक्षकांनी शाळेत हजर रहाण्याचे आदेश दिले आहेत. पण शाळेत येऊन नेमके कोणते काम करायचे याबाबतही काहीच सूचना दिल्या नाहीत.

- Advertisement -

शाळांच्या नवीन वर्षात शिक्षकांची उपस्थिती, करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांनी घ्यायची काळजी याविषयी एक- दोन दिवसांत शिक्षण विभागाकडून सूचना जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रत्येक जिल्ह्यात करोनाच्या प्रादुर्भावाची परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांनी स्थानिक परिस्थिती पाहून संस्थाचालक, शालेय व्यवस्थापन समिती, पालक-शिक्षक संघटनेची चर्चा करून निर्णय घ्यावा, अशा सूचना जारी होण्याची चिन्हे आहेत. परंतु शाळांना या सूचना मिळाल्या नसल्याने मुख्याध्यापक चिंतेत आहेत.

शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने कोणतेही आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यामध्ये संभ्रम आहे. सरकारने ऑनलाइन शिक्षणासाठी कोणतेही अ‍ॅप उपलब्ध करून दिलेले नाही.
– प्रशांत रेडीज – सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -