घरताज्या घडामोडीआम्हाला कुणी हिंदुत्वाबद्दल शिकवू नये; संजय राऊत यांचा राज्यपालांना टोला

आम्हाला कुणी हिंदुत्वाबद्दल शिकवू नये; संजय राऊत यांचा राज्यपालांना टोला

Subscribe

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील पत्रव्यवहाराच्या वादामध्ये आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही उडी घेतली आहे. राज्यपालांना लक्ष करतानाच त्यांनी भाजपविरोधातही खडे बोल सुनावले आहेत. मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका ही योग्यच असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली आहे. ‘ज्यांनी देशात हिंदुत्वाचा वणवा पेटवला. संपूर्ण देश हिंदुत्वमय केला, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उद्धव ठाकरे हे सुपूत्र आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आम्हाला कुणी हिंदुत्वाबद्दल शिकवू नये, त्याचे धडे देऊ नये. आमचे हिंदुत्व पक्के आहे’ अशा शब्दात संजय राऊत यांनी राज्यपालांच्या पत्राला उत्तर दिले आहे.

‘राज्यपाल यांनी मुख्यमंत्र्यांना इंग्रजी भाषेत पत्र पाठवले होते. त्याला मुख्यमंत्र्यांनी मराठीतून आणि ठाकरी भाषेत उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिलेले उत्तर हा ऐतिहासिक दस्तावेज आहे. मुख्यमंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करणाऱ्या राजभवनाला आणि राज्यपालांना कोणतेही आकाडतांडव न करता अत्यंत शालिनतेनं हिंदुत्वाच्या घटनांचे पालक करून उत्तर दिले आहे’ अशा शब्दांत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिका योग्य असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

‘हे सरकार लोकनियुक्त आहे. त्यामुळे राज्य सरकार हे घटनेनुसार चालते की नाही, हे बघण्याचे काम राज्यपालांचे आहे. चीनचे सैन्य लडाखच्या सीमेवर घुसले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाही तर संरक्षण मंत्र्यांनी बोलायचे असते. राज्यात कोरोनाची जी परिस्थितीत आहे. त्याबद्दल निर्णय मुख्यमंत्री घेतील. आपण हिंदुत्व आहात को नाही हे पाहाण्याचे काम राज्यपालांचे नाही’ असा टोलाही राऊत यांनी राज्यपालांना लगावला.

‘राज्यपाल हे राजकीयच आहे. ते भाजपचे नेते, संघाचे प्रचारक होते, मुख्यमंत्री, आमदार होते. हे राज्य सरकार कसे अस्थिर व्हावे, यासाठी राजभवनावर तारखा देण्यात आल्या, त्यासाठी राजभवनाचा कसा वापर झाला हे आम्ही पाहिले आहे’ असं म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. राज्यपालांनी राज्य घटनेला आवाहन दिले असेल. तर राष्ट्रपतींनी याची तातडीने दखल घेतली पाहिजे. ज्यांनी घटनेविरोधात भूमिका घेतली असेल, त्याबद्दल भूमिका केली पाहिजे, असंही राऊत म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -