घरमुंबईविशेष फेरीला विशेष प्रतिसाद नाही

विशेष फेरीला विशेष प्रतिसाद नाही

Subscribe

19 हजार विद्यार्थ्यांची पाठ

विशेष फेरीमध्ये हमखास हवे असलेले कॉलेज मिळणार अशी शाश्वती विद्यार्थ्यांना असते. मात्र प्रवेश फेरीमध्ये प्रवेश अ‍ॅलॉट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल 19 हजार 704 विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. या फेरीत प्रवेश मिळालेल्या केवळ 28 हजार 960 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे आतापर्यंत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य फेरीची वाट पाहावी लागणार आहे.

अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी 14 ऑगस्टला दुपारी 3 वाजता जाहीर झाली. विशेष फेरीसाठी 56 हजार 375 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. त्यातील 48 हजार 664 विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये अलॉटमेंट झाली होती. या विद्यार्थ्यांना 16 व 19 ऑगस्टला दुपारी 3 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचा होता. परंतु विशेष फेरीमध्येही पसंतीचे कॉलेज न मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश फेरीकडे पाठ फिरवली आहे. 19 ऑगस्टला सायंकाळी पाच वाजेपर्यंत 48 हजार 664 विद्यार्थ्यांपैकी अवघ्या 19 हजार 704 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. विद्यार्थ्यांचे कमी प्रवेश आल्याने शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून कॉलेजांना सायंकाळी सात वाजेपर्यंत प्रवेश स्वीकरण्यास मुदत दिली होती. त्यामुळे यात वाढ होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत राबविण्यात आलेल्या प्रवेश फेर्‍यांमध्ये सात हजार 711 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे विशेष फेरीत प्रवेश न घेतलेल्या आणि आतापर्यंत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना 21 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या प्रथम येणार्‍या प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) फेरीनुसार प्रवेश घ्यावा लागणार आहे. प्रथम प्राधान्य फेरीसाठी पहिल्या प्रकारातील विद्यार्थ्यांसाठी 20 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -