घरताज्या घडामोडीAarey carshed : आरे कारशेडच्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही काम नाही - रणजित...

Aarey carshed : आरे कारशेडच्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही काम नाही – रणजित सिंह देओल

Subscribe

प्रतिबंधित क्षेत्राबाहेर म्हणजेच मरोळ-मरोशी रोडच्या पश्चिमेला असणाऱ्या रॅम्पच्या सुरुवातीलाच आम्ही एक तात्पुरती सुविधा निर्माण करीत आहोत.  मार्च महिन्याच्या शेवटी एक ट्रेन येणे अपेक्षित आहे. ती ट्रेन याच तात्पुरत्या सुविधेमध्ये उतरवून घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर ट्रेनच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत.

 Aarey carshed : आरे कारशेडच्या प्रतिबंधित क्षेत्रात काम सुरू असल्याच्या बातम्या मागच्या काही दिवसात समोर आल्या होत्या. मात्र यावर आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी स्पष्टीकरण देत  आरे कारशेडच्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचं काम हाती घेतले नसल्याचे  स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध वर्तमानपत्रांनी या संदर्भात बातम्या प्रसिद्ध केल्यावर देओल प्रतिसाद देत होते.

वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या असल्याचे देओल यांनी म्हटले आहे.  प्रतिबंधित क्षेत्राबाहेर म्हणजेच मरोळ-मरोशी रोडच्या पश्चिमेला असणाऱ्या रॅम्पच्या सुरुवातीलाच आम्ही एक तात्पुरती सुविधा निर्माण करीत आहोत.  मार्च महिन्याच्या शेवटी एक ट्रेन येणे अपेक्षित आहे. ती ट्रेन याच तात्पुरत्या सुविधेमध्ये उतरवून घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर ट्रेनच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. ट्रेनची चाचणी विविध मानकांवर होणार आहे. दहा हजार कि.मी. अंतराच्या चाचणीदरम्यान स्पीड, ऑस्सिलेशन, इमर्जन्सी ब्रेक डिस्टन्स अशा चाचण्यांचा समावेश असेल. या चाचण्या तात्पुरत्या सुविधेपासून सुरु होऊन भुयारांमध्ये घेण्यात येणार आहेत असे देओल म्हणाले.

- Advertisement -

देओल पुढे म्हणाले,  प्रोटो-टाईप ट्रेनच्या चाचण्या या ठिकाणी घेण्यासाठीची आवश्यक मंजुरी राज्य शासनाने दिलेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रसिद्धी माध्यमांनी बातमीची पूर्ण खातरजमा करावी असं आवाहन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे करण्यात आले आहे.


हेही वाचा – Mumbai Metro 7: मुंबई मेट्रो 7 च्या पहिल्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार, मेट्रोच्या दराबाबत एमएमआरडीएने दिली माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -