घरमुंबईCovid-19 vaccination: मुंबईत आजपासून तिसरा टप्पा सुरू; महापालिका सुसज्ज

Covid-19 vaccination: मुंबईत आजपासून तिसरा टप्पा सुरू; महापालिका सुसज्ज

Subscribe

६० वर्ष व त्यावरील आणि ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील सहआजार असलेल्या नागरिकांचे लसीकरण

केंद्र सरकारच्या आदेशान्वये कोविड-१९ लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मार्च २०२१ सोमवार, आजपासून राबविण्यात येणार आहे. या टप्पात ६० वर्ष व त्यावरील आणि ४५ते ५९ वर्ष वयोगटातील सहआजार असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर टप्पा शासकीय तसेच खासगी रुग्णालयात राबविण्यात येणार आहे. जी खासगी रुग्णालय जन आरोग्य योजना तसेच केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्यविमा योजना राबवत असतील अशा रुग्णालयांना सदर लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे. महानगरपालिका / शासकिय रुग्णालयात लसीकरण निशुल्क: असून खासगी रुग्णालयात प्रत्येक मात्रांसाठी २५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. यात१५० रुपये लसीचे व १०० रुपये सेवा शुल्क असणार आहे

केंद्र सरकारकडून जन आरोग्य योजना राबविण्यात येणाऱ्या तसेच केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्य विमा योजना राबवत असलेल्या ५३ रुग्णालयांची यादी प्राप्त झाली आहे. सदर रुग्णालयात शासकिय मानांकानुसार पुरेशी जागा, मनुष्यबळ तसेच लसीकरणामुळे होणारे विपरीत परिणाम, व्यवस्थापन इत्यादीसाठी सुविधा उपलब्धता या बाबींचे सर्वेक्षण करुन लसीकरण केंद्र म्हणून निवड करण्यात येईल. तसेच टप्या टप्याने सदर केंद्रात लसीकरण सुरु होणार आहे. १ मार्च २०२१ पासून खालील नमुद केलेल्या महानगरपालिकेतील कोविड लसीकरण केंद्रात तिसरा टप्प्यातील नागरिकांसाठी विनामुल्य लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.

- Advertisement -

१) बी.के.सी जंबो कोविड केंद्र, बांद्रा
२) मुलूंड जंबो कोविड केंद्र, मुलूंड
3) नेस्को जंबो कोविड केंद्र, गोरेगाव
4) सेव्हन हिल रुग्णालय, अंधेरी
5) दहिसर जंबो केंद्र, दहिसर

यासह इतर १९ महानगरपालिकेतील लसीकरण केंद्रात दिनांक २ मार्च २०२१ पासून तिसरा टप्प्यातील नागरीकांसाठी विनामुल्य लसीकरण्यात येणार आहे. सध्या कार्यरत असललेल्या खाजगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात लसीकरण केवळ त्याच रुग्णालयातील आरोग्य कर्मचा-यांसाठी कार्यान्वित राहील. राज्य शासनाकडून या संदर्भात धोरण निश्चित झाल्यानंतरच या संदर्भात निर्णय घेतला जाईल. यास्तव शासन आदेशान्वये मुंबई महानगरपालिकेतील जी खाजगी रुग्णालय जन आरोग्यविमा योजना तसेच केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्यविमा योजना राबवत असतील अशा खाजगी रुग्णालयात ६० वर्ष व त्यावरील आणि ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील सहआजार असलेल्या नागरिकांचे आजपासून लसीकरण मोफत करण्यात येणार आहे.

- Advertisement -

सदर खाजगी रुग्णालयांची नावे खालीलप्रमाणे :-
१) एच. जे. दोशी हिंदू सभा रुग्णालय, घाटकोपर
२) के. जे. सोमय्या वैदयकिय महाविदयालय, सायन
३) एस. आर. सी. सी. चिल्ड्रन रुग्णालय, महालक्ष्मी

वरील नमूद केलेल्या नागरिकांनी कोविन डिजिटल मंचावर नोंदणी करणे आवश्यक असून आगाऊ नोंदणी अथवा लसीकरण केंद्रात लसीकरणापूर्वी नोंदणी करता येऊ शकेल. ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील सहआजार असलेल्या २० आजारांची यादी निश्चित करण्यात आली आहे. या सहआजार असलेल्या नागरिकांनी नोंदणीकृत वैदयकीय सेवा देणा-या व्यवसायिकांकडून प्रमाणित केलेले प्रमाणपत्र लसीकरण केंद्रात दाखविणे आवश्यक आहे.६० वर्षावरील नागरिकानी वयाबाबतचा योग्य पूरावा (कार्यालयीन, आधारकार्ड,पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र आदी) सादर करणे आवश्यक आहे. ६० वर्षावरील नागरिकांसाठी दुपारी १२:००;ते सायंकाळी ५:०० या वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे. अद्याप नोंदणी न झालेले आरोग्य कर्मचारी व कोविड आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी यांचे लसीकरण झाले नसल्यास त्यांनी लसीकरण केंद्रात जाऊन आपले ओळखपत्र (कार्यालयीन,आधारकार्ड,पॅन कार्ड) लसीकरण केंद्रावर सादर करुन लसीकरण करुन घेऊ शकतात. नागरिकांना Co-win Digital Platform हा भारत सरकारच्या निर्देशानुसार आजपासून, दिनांक १ मार्च २०२१ रोजी सकाळी ०९:०० वाजल्या पासून खुला करण्यात येईल. त्यानंतर वरील नमूद केलेल्या नागरिकांना स्वत: नोंदणी करता येईल.

देशात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात

आजपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. या टप्प्यात ६० वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तसेच गंभीर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या ४५ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना दुसऱ्या टप्प्यात कोरोना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारकडून या टप्प्यासाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या टप्प्यात सरकारी रुग्णालयासोबत खासगी रुग्णालयातही लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. खासगी रुग्णालयात कोरोना लसीच्या एका डोससाठी केंद्राने २५० रुपयांची किंमत निश्चित केली आहे. दरम्यान, सरकारी रुग्णालयांत कोरोना लस मोफत मिळू शकणार आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -