घरताज्या घडामोडीयंदा 'मुंबईचा राजा' २२ फुटांऐवजी तीन फुटांचा

यंदा ‘मुंबईचा राजा’ २२ फुटांऐवजी तीन फुटांचा

Subscribe

यंदा लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईचा राजा अशी ओळख असलेल्या गणेश गल्लीच्या गणपतीची मूर्ती यंदा २२ फूट नाही तर ३ फुटांची असणार आहे. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गणपती मंडळामध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर गणेशोत्सव मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा वर्गणी गोळा न करताना साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी मंडळाने लहान मूर्ती आणून उत्सवाची उंची वाढवणार असल्याचे मंडळाचे सचिव स्वप्निल परब म्हणाले. तसेच गणपती बाप्पाचे दर्शन सोशल डिस्टन्सिंग पाळून देणार आणि इतरांसाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करणार असल्याची माहिती स्वप्नील परब यांनी दिली.

- Advertisement -

तसेच परळचा राजा म्हणजे नरेपार्कच्या गणपतीची मूर्ती २३ फुटांऐवजी ३ फुटांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहे. तसेच विसर्जन मिरवणूक न करता कृत्रिम तलावात विसर्जन करणार आहेत. या मंडळाने वर्गणी देखील गोळा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर खेतवाडीतल्या ३१ गणेशोत्सव मंडळाने दोन ते पाच फुटापर्यंतच्या मूर्ती घडवणार असल्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

वडाळा येथील जीएसबी गणेशोत्सव मंडळाने भाद्रपदऐवजी फेब्रवारी २०२१ मध्ये माघी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पुण्यातील मानाचे पाच गणपती मंडळाने देखील अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा येणार असल्याची माहिती दिली आहे. यंदा नित्य धार्मिक कार्यक्रमाव्यतिरिक्त इतर सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Update: देशात २४ तासांत १४ हजार ९३३ नवे कोरोनाचे रुग्ण, ३१२ जणांचा मृत्यू!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -