घरमुंबईपाणबुडीची माहिती लीक केली , नौदलाचे तीन अधिकारी अटकेत

पाणबुडीची माहिती लीक केली , नौदलाचे तीन अधिकारी अटकेत

Subscribe

भारतीय नौदलाच्या किलो क्लास पाणबुडीच्या पुनर्विकासाची गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) नौदलातील एक कार्यरत अधिकारी आणि दोन सेवानिवृत्त अधिकार्‍यांना अटक केली आहे. या तीन अधिकार्‍यांच्या अटकेशिवाय या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता आहे. तसेच माहिती लीक करण्यामध्ये परदेशी गुप्तचर संस्थांचा सहभाग होता की नाही हे अद्याप अस्पष्ट असल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास नौदलाच्या व्हाईस अ‍ॅडमिरल आणि रिअर अ‍ॅडमिरल यांच्याकडून केला जात आहे.

गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप असलेला अधिकारी मुंबईचा असून तो नौदलात कमांडर पदावर आहे. किलो क्लास पाणबुड्या, रशियामध्ये रशियन नौदलासाठी डिझाइन केलेल्या आणि बांधलेल्या आहेत. या पाणबुड्या सध्या अनेक देशांच्या नौदलात सेवेत आहेत. भारतात या पाणबुड्यांचे सिंधुघोष वर्गात वर्गीकरण केले जाते. आजपर्यंत, सरकारने अशा १० पाणबुड्या विकत घेतल्या आहेत, त्या सर्वांचे गरजेनुसार पुनर्विकास आणि आधुनिकीकरण झाले आहे.

- Advertisement -

कार्यरत असणारा नौदलातील अधिकारी मुंबईत कामाला असून तेथून त्याला अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी एका इंग्रजी वेबसाईटला सांगितले. माहिती लीक केल्याची घटना मात्र दिल्लीत घडली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेले नौदलाचे अधिकारी माहिती लीक करण्याच्या इतर प्रकरणांमध्ये अटक केलेल्यांपैकी सर्वात वरिष्ठ असू शकतात, असेदेखील सूत्रांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -