घरमुंबई'विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शिक्षकांनी देशाचे भवितव्य घडवावे'

‘विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शिक्षकांनी देशाचे भवितव्य घडवावे’

Subscribe

ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्ताने १० आदर्श शिक्षकांना जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

“जिल्हा परिषदेच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळेतील वाढलेली पटसंख्या हे त्याचे उदाहरण आहे. अशाच पद्धतीने शिक्षण क्षेत्रात होणारे बदल आत्मसात करुन शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देशाचे भवितव्य घडवावे,” असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्ताने १० आदर्श शिक्षकांना जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.

Through the students, teachers should create the future of the country १
ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्ताने १० आदर्श शिक्षकांना जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ते पुढे म्हणाले की, “शिक्षण हा प्रगतीचा पाया आहे. शिक्षणामध्ये क्रांती घडविण्याची ताकद आहे. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वाढलेल्या पटसंख्येच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण दिले जात आहे, याची खात्री होते. अशाच पद्धतीने देशाचे उत्तम नागरिक घडविण्यासाठी प्रयत्न करावेत,” असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांना कायम मदतीचा हात देत असून, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध आहोत, अशी ग्वाहीसुद्धा एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

आदर्श शाळांसाठीसुद्धा स्पर्धा घ्यावी

“ज्या क्षेत्रात विद्यार्थ्याला गती असेल, त्या क्षेत्रात विद्यार्थ्याचा नावलौकिक कसा होईल? याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे. आदर्श शिक्षकांप्रमाणेच आदर्श शाळांसाठीही स्पर्धा घ्यावी,” असे आवाहन खासदार कपिल पाटील यांनी यावेळी केले. “जिल्हा परिषदेतील शाळांच्या कायापालटाचा निर्धार करुन शिक्षण समितीने कार्याला सुरुवात केली. त्यातून जिल्हा परिषदेच्या मुरबाड येथील शाळेत प्रथमच संपूर्ण पटसंख्या भरली. मुरबाडप्रमाणेच जिल्ह्यातील अन्य शाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ झाली आहे,” अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती सुभाष पवार यांनी दिली. तसेच “जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनेक भौतिक सुविधा दिल्या जात असून, गुणवत्तेवर भर दिला जात आहे. गेल्या वर्षी तांत्रिक कारणांमुळे पुरस्कार सोहळा झाला नाही. यंदा कोणत्याही दबावाविना केवळ गुणवत्तेवर १० शिक्षकांची निवड करण्यात आली,” अशी माहितीसुद्धा सुभाष पवार यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमात आमदार निरंजन डावखरे यांनीसुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “ग्रामीण भागातील शाळांना वीज बिलांचा वाढता खर्च भेडसावतो. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सौरऊर्जेवरील प्रकल्प उपलब्ध केल्यास शाळांना सुविधा प्राप्त होईल. त्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत,” असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.

हेही वाचा – महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

पुरस्कारप्राप्त शिक्षक

गिरीश ठाकरे, जांभूळ शाळा ता. कल्याण; चारुशिला किरण भामरे, आघाणवाडी शाळा, ता. अंबरनाथ; रमेश मंगल्या म्हसकर, वैजोळा, ता. भिवंडी; संजय गोविंद उंबरे, पाटगाव, ता. मुरबाड; प्रमोद भाऊ पाटोळे, वायाचापाडा, ता. शहापूर; मोहिनी पंडीत बागूल, मुळगाव, ता. अंबरनाथ; अंकूश नारायण ठाकरे, राहनाळ, ता. भिवंडी; नारायण घावट, भिसोळ, ता. कल्याण; डॉ. निळकंठ रामचंद्र व्यापारी, आंबेळे खु., ता. मुरबाड; भगवान दुंदा फर्डे, मुगाव, ता. शहापूर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -