घरमुंबईनुकसानभरपाई टाळण्यासाठी महावितरणकडून हात वर

नुकसानभरपाई टाळण्यासाठी महावितरणकडून हात वर

Subscribe

पाटील इस्टेट आगप्रकरण

शिवाजीनगर येथील पाटील इस्टेटला लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. पण महावितरणने मात्र आता या प्रकरणात हात वर केले आहेत. महावितरणने या संदर्भातील आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार पाटील इस्टेटमध्ये लागलेली आग नक्की कोणत्या कारणामुळे लागली आहे हे सांगता येत नाही, असे म्हटले आहे. महावितरणच्या या अहवालामुळे या घटनेतील नुकसान झालेल्या परिवारांना नुकसान भरपाई मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.

शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट येथील झोपडपट्टीला २८ नोव्हेंबर रोजी आग लागली होती. या आगीत जवळपास २०० हून अधिक झोपड्या आगीत भस्मसात झाल्या होत्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग एक तर सिलेंडरच्या स्फोटामुळे किंवा शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचार्‍यांनी ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. नेमकी आग कशामुळे लागली या घटनेचा तपास कारण्याकरिता तहसिलदारांनी महावितरणला पत्र पाठवले होते. महावितरणच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि याचा अहवाल नुकताच तहसिलदारांना पाठवला.

- Advertisement -

या अहवालात या घटनास्थळाचे निरीक्षण करण्यात आल्याचे म्हटले आहे. घटनास्थळी असलेले इलेक्ट्रॉनिक्स साहित्य आगीत नष्ट झालेले आढळले. यामुळे ही आग शॉर्टसर्किटमुळेच लागली आहे, असा कोणताही पुरावा नसल्याचे म्हटले आहे. आग लागलेल्या जागेच्या निरीक्षणात या झोपडपट्टीत एकाच मीटरवर अनेक जणांना वीज पुरवण्यात आली होती. याआधी खराडी येथे झालेल्या टार्न्सफॉर्मर दुर्घटनेतही महावितरणाच्या अधिकार्‍यांनी आपले हात वर केले होते. त्यामुळे या घटनेत मृत्यू झालेल्या दोघा इंजिनिअर्सच्या परिवारांना मोबदला मिळाला नव्हता. आता पाटील इस्टेट प्रकरणाचे देखील असेच काहीसे होण्याची भीती व्यक्त केली जाते. महावितरणाचे अधिकारी सी. टी. थोरात यांनी पाटील इस्टेटमध्ये लागलेल्या जागेचे निरीक्षण केले असता कोणताच पुरावा सापडला नाही, असे सांगितले. नुकसानभरपाई द्यायला लागू नये, म्हणून महावितरणचे अधिकार टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -