घरमुंबईपैसे द्या आणि डेब्रिजच्या गाड्या खाली करा

पैसे द्या आणि डेब्रिजच्या गाड्या खाली करा

Subscribe

एमआयडीसीच्या आवारात डेब्रिजचे डोंगर राजकीय वरदहस्ताने माफियांचा धुमाकूळ

ट्रकचे ३०० रुपये आणि हायवा गाडीचे ६०० रुपये याप्रमाणे एमआयडीसीच्या आवारात डेब्रिजच्या गाड्या खाली करण्यासाठी पैसे घेतले जात असून या ठिकाणी रोज मुंबईसह इतर उपनगरातील शेकडो गाड्या खाली केल्या जातात. विनापरवाना शेकडो गाड्या रोज खाली होत असल्याने या ठिकाणी डेब्रिजचे डोंगर उभे राहत आहेत. मोठ्या राजकीय नेत्यांचा या डेब्रिज माफियांना आशीर्वाद असल्याने एमआयडीसी परिसरामध्ये डेब्रिज माफियांनी धुमाकूळ घातला आहे.
एमआयडीसीच्या दिघा येथील ग्रीन वर्ल्ड इमारतीच्या मागे असणार्‍या वाहनतळाच्या राखीव भूखंडावर गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात डेब्रिज आणून टाकले जाते.

दोन आठवड्यांपूर्वी कमी असणार्‍या डेब्रिजचे ढिगारे अचानकपणे या ठिकाणी वाढून लागले. त्यामुळे डेब्रिज वाढू लागले असून ते भूखंडाच्या प्रवेशद्वारजवळील गेटपर्यंत आले आहे. त्याचवेळी दुसरीकडे महापे एमआयडीसीमधील डोंगर दरीतही मोठ्या प्रमाणात डेब्रिजच्या गाड्या खाली केल्या जात आहेत. त्या ठिकाणी गाड्या खाली करण्यासाठी प्रती ट्रकचे ३०० रुपये आणि हायवा गाडीचे ६०० रुपये या प्रमाणे रक्कम घेतली जाते.

- Advertisement -

एखादी नवीन गाडी जर त्या ठिकाणी येणार असेल तर त्या गाडीला प्रतिमाह परवानगीसाठी दोन हजार रुपये आणि खाली करण्यासाठी ३०० ते ६०० रुपये मोजावे लागतात. रोज शेकडो गाड्या या ठिकाणी येत असल्याने ही रक्कम कोणाच्या खिशात जाते हे गुलदस्त्यात आहे. राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याने एमआयडीसी महामंडळाऐवजी या नेत्यांची परवानगी घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येते. एवढ्या मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकण्यात येत असतानादेखील पालिका आणि एमआयडीसी दोन्ही प्रशासन अनिभज्ञ आहेत. तर इतर वेळेला रस्त्यांच्या बाजूला थोड्या फार प्रमाणात डेब्रिज टाकत असणार्‍या वाहनांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

मात्र वाहनतळासह इतर भूखंडावर शेकडो डेब्रिजच्या गाड्या खाली करुन येथे डेब्रिजचा डोंगर उभा राहत आहे. असे असताना पालिकेच्या डेब्रिज पथकाला त्याचा थांगपत्ता लागत नाही. त्यावरून डेब्रिज माफियांबरोबर पालिका अधिकांर्‍याची हातमिळवणी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एमआयडीसीचा दिघा येथील ग्रीन वर्ल्ड या इमारतीच्यामागे वाहनतळासाठी राखीव भूखंड आहे. या भूखंडावर डेब्रिज टाकण्यात येत आहे. मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी डेब्रिजचे डोंगर उभे राहत आहेत. काही दिवसांपूर्वी विटावा येथील ठाणे महानगरपालिकेच्या मलनि:सारणाच्या प्लान्टला आग लागण्याची घटना घडली होती. ही आग विझवण्यासाठी जाणार्‍या अग्निशामन दलाला घटनास्थळी पोहताना वाटेतल्या डेब्रिजचा अडथळा आला. मात्र मागील दोन आठवड्यांमध्ये या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात डेब्रिज आणून टाकले आहे. ते वाहनतळाच्या प्रवेशद्वारपर्यंत पोहचले आहे.

- Advertisement -

एमआयडीसीच्या भूखंडावर डेब्रिज टाकण्यात येत असेल तर त्याची पाहणी करण्यात येईल.
– एम.एस.कलकुटकी, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी

एमआयडीसीच्या भूखंडावर डेब्रिज पडत असल्यास एमआयडीसीने लक्ष देणे आवश्यक आहे. तरी पालिकेच्या डेब्रिज पथकाला संबधित घटनास्थळांची पाहणी करण्याच्या सूचना देण्यात येतील.
– अमरिश पटनिगीरी, उपआयुक्त परिमंडळ १, नमुंमपा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -