घरमुंबईहॉटेलसाठी शौचालयातील पाणी

हॉटेलसाठी शौचालयातील पाणी

Subscribe

नालासोपारा पूर्वेकडील एका इमारतीत असलेल्या काही हॉटेलमध्ये चक्क त्याच इमारतीत असलेल्या शौचालयातील पाणी वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खवय्यांच्या जीवाशी खेळणार्‍या या हॉटेलांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

नालासोपारा पूर्वेला रेल्वे स्टेशनलगत असलेल्या बाप्पा सीताराम मार्केटमधील हा प्रकार आहे. एका जागरूक नागरीकाने इमारतीमधील शौचालयातील पाणी हॉटेलांमध्ये वापरले जात असल्याचा व्हिडिओ काढला आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. बाप्पा सीताराम मार्केटमध्ये सार्वजनिक शौचालय आहे. त्याच ठिकाणचे पाणी हॉटेल, चायनीज भेळ, सँडविच, वडापाव, व्हेज पुलाव, दहिवडा, मेथी पराठा असे पदार्थ बनवणारे गाडीवाले वापरत असल्याचे या व्हिडीओमधून दिसून येत आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे दिवसाढवळ्या व्यावसायिक खाण्याचे पदार्थ बनवण्यासाठी शौचालयातील पाणी वापरत असताना कुणीही याविरोधात बोलत नसल्याचे उजेडात आले आहे. एकतर ही इमारत स्टेशननजिक असल्याने येजा करणारे अनेक जण याठिकाणी खाद्यपदार्थ खात असतात. घाणेरडे पाणी वापरत असल्याने त्यांच्या जीवाशी खेळ केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -