घरताज्या घडामोडीपर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बँडस्टँड येथे कोट्यवधीचे 'ट्री हाऊस' उभारणार

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बँडस्टँड येथे कोट्यवधीचे ‘ट्री हाऊस’ उभारणार

Subscribe

वांद्रे बँडस्टँड येथील पालिका उद्यानात ५०० चौ.मी. जागेत पुढील ६ महिन्यात आकर्षक आणि पर्यावरण पूरक असे 'ट्री हाऊस' संपूर्णपणे लाकडाचा वापर करून उभारण्यात येणार आहे.

मुंबईकरांसह देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि काहीतरी अनोखी संकल्पना म्हणून वांद्रे बँडस्टँड येथील पालिकेच्या उद्यानात लवकरच ‘ट्री हाऊस’, उभारण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी खर्च फक्त एक कोटी रुपये इतकाच येणार आहे.

राज्याचे पर्यटन, पर्यावरण व पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई महापालिका व राज्य सरकारच्या जिल्हा नियोजन समितीने (डीपीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने हे ‘ट्री हाऊस’ उभारण्यात येणार आहे. त्यामुळे हे ‘ट्री हाऊस’ उभारल्यानंतर सदर उद्यानात बच्चे कंपनीची गर्दी हमखास होणारच. सध्या भायखळा येथील राणी बागेतील ‘पेंग्विन’ हे बच्चे कंपनीचे खास आकर्षण असून त्यांना पाहण्यासाठी बच्चे कंपनी आणि त्यांचे पालकसुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

- Advertisement -

वांद्रे बँडस्टँड येथील पालिका उद्यानात ५०० चौ.मी. जागेत पुढील ६ महिन्यात आकर्षक आणि पर्यावरण पूरक असे ‘ट्री हाऊस’ संपूर्णपणे लाकडाचा वापर करून उभारण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या जिल्हा नियोजन समितीने (डीपीसी)एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे.


हेही वाचा – भविष्यात आरोग्य विभागातील भरतीत कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार प्राधान्य

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -