घरमुंबईलग्नाचे आमिषाने मालिका अभिनेत्रीचे लैंगिक शोषण

लग्नाचे आमिषाने मालिका अभिनेत्रीचे लैंगिक शोषण

Subscribe

प्रियकरासह त्याच्या आई आणि भावाविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून एका 22 वर्षीय मालिका अभिनेत्रीवर लैगिंक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी या अभिनेत्रीच्या तक्रारीवरुन प्रियकरासह त्याची आई आणि भावाविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याने अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

सौरभ राजकुमार तोलानी, त्याचा भाऊ चंदन राजकुमार तोलानी आणि आई जयश्री राजकुमार तोलानी अशी या तिघांची नावे आहेत. 22 वर्षांची ही अभिनेत्री अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात राहत असून ती मूळची उत्तर प्रदेशची रहिवाशी आहे. तिने काही हिंदी चॅनेलच्या मालिकांमध्ये काम केले असून सध्या ती जाहिरातीमध्ये काम करते. पाच वर्षांपूर्वी ती मुंबईत पुढील शिक्षणासाठी आली होती. बॅचलर इन मास मिडीया या कोर्ससाठी तिने चर्चगेटच्या जयहिंद महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. यावेळी तिथे सौरभ तोलानी याच्याशी ओळख झाली होती. मात्र ते दोघेही जास्त एकमेकांशी बोलले नव्हते. मे 2018 रोजी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ती पुन्हा सौरभच्या संपर्कात आली होती. त्यानंतर या दोघांनी त्यांचे मोबाईल क्रमांक एकमेकांना दिले होते. फोन तसेच व्हॉटअपच्या माध्यमातून ते दोघेही नंतर संपर्कात होते.

- Advertisement -

हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचार

याचदरम्यान त्याने तिला प्रपोज केले होते. तिला लग्नाचीही मागणी घातली होती. डिसेंबर महिन्यांत साखरपुडा आणि पुढच्या वर्षी लग्न करु असे त्याने तिला सांगितले होते. तिला तो आवडत असल्याने तिनेही त्यास होकार दिला होता. 3 ऑगस्टला ती दिल्लीला गेली होती. यावेळी दिल्ली विमानतळावर सौरभ तिला घेण्यासाठी आला होता. दिल्लीतून ते दोघेही हरियाणा येथे गेले. रात्री उशिरा ती सौरभ, त्याची बहिण, तिचा मित्र असे चौघेही राजस्थानला गेले होते. तेथीलच ग्रॅट तारा हॉटेलमध्ये ते रात्री राहिले होते, यावेळी या दोघांमध्ये शारीरिक संबंध आले होते. लग्नाचे आमिष दाखवून सौरभने तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता.

घरच्यांची धमकी

3 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत राजस्थानासह दिल्ली, सौरभच्या राहत्या घरासह कानूपर शहरात अनेकदा लैंगिकअत्याचार केला होता. मात्र नंतर त्याने लग्नाला घरच्यांचा विरोध असल्याचे सांगून तिच्याशी असलेले संबंध तोडण्याचा प्रयत्न केला. याबाबत तिने त्याच्या आई आणि भावाला विचारणा केली, त्यांनीही तिला धमकी देत काही पैसे घेऊन प्रकरण मिटविण्यास सांगितले. तसेच तिच्याशी अश्लील संभाषण करुन तिचा अपमान केला होता. या घटनेनंतर तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगितला.

- Advertisement -

अद्याप अटक नाही

तिच्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलिसांनी या अभिनेत्रीचा प्रियकर सौरभ तोलानी याच्याविरुद्ध फसवणुकीसह बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांत त्याच्या आई आणि भावाला सहआरोपी करण्यात आले आहे. त्यांच्यावर तिला धमकी दिल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या तिघांची पोलिसांकडून जबानी नोंदवून घेतली जाणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -