घरमुंबईमुंबईत समुद्रात बुडून दोन मुलांचा मृत्यू; ६ जण बचावले

मुंबईत समुद्रात बुडून दोन मुलांचा मृत्यू; ६ जण बचावले

Subscribe

समुद्रात पोहायला गेलेल्या ८ मुलांपैकी २ अल्पवयीन मुलांचा खोल पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला तर ६ जण बचावले आहेत. ही घटना प्रियदर्शनी पार्क, मलबार हिल येथील समुद्राच्या ठिकाणी सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. रेहमान रिझवान शेख (१५) व मोहम्मद दिलशाद शेख (१२) अशी मृत मुलांची नावे आहेत. यासंदर्भातील माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेहमान रिझवान शेख (१५) व मोहम्मद दिलशाद शेख (१२) हे दोघेजण त्यांचे इतर ६ मित्र असे एकूण ८ जण प्रियदर्शनी पार्क, नेपियन्सी रोड, मलबार हिल येथील समुद्राच्या ठिकाणी सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास पोहत असताना त्यांना खोल पाण्याचा अंदाज आला नाही व ते अचानकपणे समुद्रात ओढले जाऊन बुडू लागले. जिवाच्या भीतीने त्यांनी आरडाओरड केली. रेहमान रिझवान शेख (१५) व मोहम्मद दिलशाद शेख (१२) हे दोघे समुद्रातील खोल पाण्यात ओढले गेले व समुद्रात बुडाले. मात्र त्यांचे सहा मित्र हे कसेतरी बचावले व समुद्र किनारी सुखरूप पोहोचले.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने व पोलिसांनी समुद्रात बुडालेल्या रेहमान व मोहम्मद यांचा कसून शोध घेतला. अखेर त्या दोघांचा शोध लागला मात्र तोपर्यंत खूप उशीर होऊन त्या दोघांचा मृत्यू झाला होता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -