घरमुंबईउद्धव ठाकरेंकडून फडणवीस सरकारच्या कामांची स्तुती

उद्धव ठाकरेंकडून फडणवीस सरकारच्या कामांची स्तुती

Subscribe

मुंबई मेट्रोच्या मेड इन इंडिया कोचचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारच्या कामांची स्तुती केली. यापूर्वीच्या सरकारनेही चांगली कामे केली. पूर्वीच्या सरकारने चांगले काम केले नाही, असे म्हणणारा मी नतद्रष्ट नक्कीच नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. चारकोप मेट्रो डेपो येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांच्यासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होते. यावेळी भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत फडणवीस सरकारच्या कामांची स्तुती केली.

शिवसेनाप्रमुख म्हणायचे, लोकांना पाहिजे ते द्या. बरोबर आहे. जनतेला जे आवश्यक आहे, जनतेला ते कळले पाहिजे, अरे हेच तर मला पाहिजे होते. तसे जनतेला जे आवश्यक आहे ते महाराष्ट्र सरकार देत आहे. प्रवीण दरेकर, तुम्हीपण बसला आहात. यापूर्वीच्या सरकारनेही चांगलं काम केलं. असं नाही की, यापूर्वीच्या सरकारने चांगलं काम केलं नाही, असं म्हणणारा मी नतभ्रष्ट नक्कीच नाही. पूर्वीच्या सरकारने जे काम केलं ते नाकारण्याचा नतभ्रष्टपणा मी करणार नाही. पण पूर्वीच्या सरकारपेक्षा अधिक गतीने मी ते काम पूर्ण करतोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

काही वेळापूर्वी मी बीएसटीच्या आधुनिक केंद्राचा उल्लेख केला. त्यामध्ये एमएमआर रिझनमध्ये जे प्रवासी लोक येतात त्यांना पुढचा बस स्टॉप कुठे याची माहिती देणारी यंत्रणा असणार आहे. अशी लोकाभिमुख कामे सुरू आहेत. लोकाभिमूख म्हणजे काय? लोकांचे मुख एका बाजूला आणि सरकारचे मुख एका बाजूला, असं नाही. याला लोकाभिमूख नाही म्हणत. लोकांवर अन्याय, अत्याचार होत आहे. ते काहीतरी मागत आहेत. पण सरकार ढिम्म हालायला तयार नाही हे लोकाभिमूख सरकार असूच शकत नाही. तशी माझी लोकाभिमुखची व्याख्याच नाही, असंदेखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -