घरमुंबईप्रिय, उद्धव ठाकरे, सोनियांच्या पत्राद्वारे शुभेच्छा!

प्रिय, उद्धव ठाकरे, सोनियांच्या पत्राद्वारे शुभेच्छा!

Subscribe

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. प्रिय, उद्धव ठाकरे, असे म्हणून सोनिया यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना उद्याच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही आदित्य ठाकरे यांनी निमंत्रण दिले. निमंत्रण देण्यासाठी बुधवारी रात्री उशिरा आदित्य ठाकरे दिल्लीला पोहोचले. त्यावेळी त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांना पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत.

उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना, डिअर उद्धव ठाकरे… असे म्हणून सोनियांनी पत्राची सुरुवात केली. तुमच्या नवीन राजकीय कारकिर्दीस माझ्याकडून व्यक्तिगत शुभेच्छा. महाराष्ट्रातील जनतेचे हित आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार काम करेल. मी या सोहळ्याला उपस्थित राहू शकत नसल्याचेही सोनियांनी म्हटले आहे.

- Advertisement -

भाजपच्या एकाधिकारशाहीला देशातील जनता तोंड देत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण गढूळ बनले असून अर्थव्यवस्था कोलमडलीय, असेही सोनिया यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -