घरमुंबईउल्हासनगर मध्यवर्ती हॉस्पिटल परिसरात घाणीचे साम्राज्य

उल्हासनगर मध्यवर्ती हॉस्पिटल परिसरात घाणीचे साम्राज्य

Subscribe

हॉस्पिटल परिसरात किटकनाशक फवारणी करण्याची मागणी रूग्णांतर्फे करण्यात आली आहे.

उल्हासनगर शहरातील कॅम्प नं. ३ येथे मध्यवर्ती हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात मच्छर आढळत आहेत. यामुळे येथील रूग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तेव्हा हॉस्पिटल प्रशासनाने परिसरात वेळीच कीटकनाशक फवारणी करावी. त्याचप्रमाणे हॉस्पिटल परिसर स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी हॉस्पिटलमधील रूग्णांकडून होत आहे. हॉस्पिटल प्रशासन तसेच पालिकेच्या दुर्लक्षामुळे हॉस्पिटल परिसरात दिवसेंदिवस घाणीचे साम्राज्य पसरत असल्याची तक्रार येथील रूग्णांकडून करण्यात आली आहे. रूग्णांच्या या तक्रारीनंतर तरी हॉस्पिटल प्रशासन आणि पालिकेला जाग येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा – भाजपच्या लोकप्रतिनिधींना पूरग्रस्तांच्या मदतीचे आवाहन

स्वच्छता आणि कीटकनाशक फवारणीची मागणी

उल्हासनगरमधील मध्यवर्ती हॉस्पिटलच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मच्छरांचा सुळसुळाट झाला आहे. या मच्छरांमुळे हॉस्पिटलमधील रूग्ण हैराण झाले आहेत. हॉस्पिटलच्या आवारासह परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून साफसफाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. याशिवाय हॉस्पिटलच्या आवारातील नालेही उघड्या स्थितीत असून ओव्हरफलो होऊन वाहत आहेत. परिणामी सांडपाण्याची दुर्गंधी आणि मच्छरांचा प्रादुर्भाव यामुळे येथील रूग्णांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. हॉस्पिटल परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतेसह या परिसरात महापालिकाकडून कोणतीच कीटकनाशक फवारणी केली जात नसल्याने हॉस्पिटलमधील रूग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे हॉस्पिटल परिसरात कीटकनाशक फवारणी करण्यात यावी, अशी मागणी रूग्णांमधून केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -