घरमुंबईउल्हासनगरमध्ये बॅनर लावताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू

उल्हासनगरमध्ये बॅनर लावताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू

Subscribe

नवा बॅनर बसवण्याचे काम तीन तरुणांना दिले होते. त्यासाठी या तरुणांना २०० रुपये देण्यात येणार होते. बॅनर शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लावण्यास सांगितला होता.

उल्हासनगरमध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. शाळेचा बॅनर लावताना शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे. बॅनर लावताना विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने तरुणाला शॉक लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ मध्ये असणाऱ्या गुरुनानक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ही घटना घडली आहे.

शॉक लागून तरुणाचा मृत्यू

गुरुनानक इंग्रजी शाळेचा बॅनर जुना जाला होता. त्यामुळे हा बॅनर काढून नवा बॅनर बसवण्याचा निर्णय शाळेने घेतला. हा नवा बॅनर बसवण्याचे काम तीन तरुणांना दिले होते. त्यासाठी या तरुणांना २०० रुपये देण्यात येणार होते. बॅनर शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लावण्यास सांगितला होता. त्याप्रमाणे हे तरुण तिसऱ्या मजल्यावर गेला. बॅनर लावण्याचे काम करत असताना ज्याठिकाणी बॅनर लावण्यात येणार होता त्याच्याशेजारी असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात बॅनर आला.

- Advertisement -

पोलीस तपास सुरु

दरम्यान, शॉक लागून या घटनेमध्ये प्रमोद पंडित या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेल्या एक तरुण जखमी झाला आहे. या घटनेनंतर उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसा ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जखमी झालेल्या तरुणाने या घटनेनंतर शाळा प्रशासनाने पळ काढल्याचा आरोप केला आहे. उल्हासनगर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -