घरमुंबईउरण पोलिसांची सामाजिक बांधिलकी, मजुरीसाठी आलेल्यांना केले अन्न वाटप

उरण पोलिसांची सामाजिक बांधिलकी, मजुरीसाठी आलेल्यांना केले अन्न वाटप

Subscribe

उरण पोलिसांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून हातावर पोट असलेल्या मजुरांसाठी आणि झोपडपट्टीतील लोकांसाठी खाऊ आणि अन्न वाटप करून नागरीकांपुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे.

करोना महामारीच्या संकटात लोकांना शिस्त लावणे, कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणे अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना उरण पोलिसांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून हातावर पोट असलेल्या मजुरांसाठी आणि झोपडपट्टीतील लोकांसाठी खाऊ आणि अन्न वाटप करून नागरीकांपुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जगदिश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलिसांनी नांदेड येथून नवी मुंबई मेट्रोसाठी आलेले तसेच उरणमध्ये अडकून पडलेल्या ३५ ते ४० कामगारांची जबाबदारी घेवून त्यांना अन्न व खाद्य पदार्थांचे वाटप केले. उरण पोलीस एवढ्यावरच न थांबता त्यांनी उरण परिसरातील नाका कामगार, झोपडपट्टीतील मुले आणि वयस्कर मंडळी यांच्या घरी जाऊन त्यांना खाऊचे वाटप केले. उरण पोलिसांच्या या सामाजिक बांधिलकीचे उरणच्या नागरीकांकडून कौतुक होत आहे.

हेही वाचा – CoronaVirus: आता दोन दिवसांत नाही तर अडीच तासांत करोनाचे कळणार रिपोर्ट!

- Advertisement -

करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी जगभरातील देशांमध्ये विविध उपाययोजना राबवल्या जात आहे. भारतातही करोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. यामुळे संपूर्ण देशच लॉकडाऊन करण्यात आला आहे. पण तरीही देशभरात आतपर्यंत ६९४ लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर १६ जणांचा मृत्यू झाला आहे. याचदरम्यान जगातील सर्वात मोठ्या संशोधन संस्थेने भारतासाठी पुढील चार महिने धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे. तसेच भारताने यासाठी काय करणे अत्यावश्यक आहे यासंबंधी मार्गदर्शनही केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -